How To Find Silent Android Device : आजच्या काळात फोनशिवाय कोणतेच काम होत नाही. पण याच फोनमुळे अनेकदा कामे खोळंबून राहतात आणि अशा वेळी काय करावे लक्षात येत नाही. कित्येकदा आपण घाईगडबडीत बाहेर पडतो आणि नेमका त्याचवेळी फोन हरवतो. कधी कधी फोन आपण Silent Mode वर टाकतो. मग अशा वेळी मात्र हरवलेला फोन शोधणं अवघड होऊ शकतं. परंतु सायलेंट मोडवर गेल्यानंतर, समस्या उद्भवते. अशावेळी आपण दुसऱ्या लोकांच्या फोनवरून कॉलकरून डिवाइस शोधण्याचा प्रयत्न करतो. पण नेमका फोन सायलेंट मोडवर असतो. पण आता टेन्शन घेऊ नका, आता ही समस्या दूर होणार आहे. अँड्रॉइडच्या नव्या व्हर्जनसह, गुगल ही समस्या सोडवणार आहे. परंतु, याकरता नेमके काय करायचे, हे जाणून घ्या...  


अँड्रॉइडच्या नवीन व्हर्जनच्या साहाय्याने तुम्ही तुमचा अँड्राॅईड फोन शोधू शकता. याचाच अर्थ फोन Silent Mode मध्ये असेल तरीही त्याला ट्रॅक करता येणार आहे. Google मध्ये Find My Device हे एक भन्नाट फिचर आहे. अनेकांना याची कल्पना नाही, मात्र हे फिचर खूप फायद्याचे आहे. याच फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन ट्रॅक केला जाऊ शकतो. तुमच्या फोनमध्ये Google अकाउंच असल्यास हे फिचर ऑटोमॅटीक यात सुरू राहते. हे फिचर तुम्ही अॅप आणि वेब या दोन्हीवर वापरू शकता. 


हे फिचर कसे  वापरावे?


हे फिचर वापरण्याकरता तुम्हाला फार सोपे काम करायचे आहे. android.com/find किंवा https://www.google.com/android/find/ वर ​​जावे लागेल. यानंतर तुमच्या डाव्या बाजूला त्या सगळ्या फोनची लिस्ट दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ई-मेल आयडीने लाॅगिन करावे लागेल. म्हणजेच, तुम्हाला त्याच ई-मेल आयडीने android.com/find वर ​​लॉगिन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला डावीकडे फोनची रिंग वाजण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर, सायलेंट मोडमध्ये असतानाही फोन वाजेल आणि तुम्हाला तुमचा फोन सहज शोधता येईल. फोनद्वारे तुम्हाला त्याचे रिअल टाईम लोकेशन दिसेल. ही रिंग 5 मिनिटे सुरु राहील. मोबाईलवर पावर बटन प्रेस करून किंवा फाईंड माय डिवाइसवर स्टॉप रिंगिंग प्रेस करून देखील रिंग बंद करता येईल. महत्वाची बाब म्हणजे, हे फिचर वापरताना ‘Device located’ हे नोटिफिकेशन दिसलं पाहिजे.


इतर महत्वाच्या बातम्या :


WhatsApp : आता फोटोंव्यतिरिक्त व्हॉट्सअॅपवर HD व्हिडीओही शेअर करता येणार; यूजर्सना हे 2 पर्याय मिळतील