WhatsApp Safety Tools feature : भारतात 500 दशलक्षाहून अधिक लोक WhatsApp वापरतात. अॅपमधील लोकांची गोपनीयता आणि सुरक्षा राखण्यासाठी कंपनी वेळोवेळी अपडेट करत असते. दरम्यान, WhatsApp एका नवीन सेफ्टी टूल्स फीचरवर काम करत आहे जे तुम्हाला अनोळखी नंबरवरून मेसेज आल्यावर पुढे काय करायचे ते कळवेल. या अपडेटची माहिती  Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे. सेफ्टी टूल्स फीचर अंतर्गत, व्हॉट्सअॅप तुम्हाला एक पॉप-अप स्क्रीन दाखवेल जे तुम्हाला अज्ञात नंबरसह काय करू शकते याबद्दल मार्गदर्शन करेल. 


काय आहे फीचर


मिळालेल्या माहितीनुसार, या फीचरमुळे यूजरला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेला मेसेज एका वेगळ्या प्रकारच्या स्क्रीनवर दिसणार आहे. यासोबतच, अनोळखी व्यक्तींकडून आलेले मेसेज कसे तपासावेत आणि याबाबत कशी खबरदारी घ्यावी याच्या काही टिप्स देखील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना देईल.


या फीचरवर आहे काम सुरू 


व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे, त्यातील एक युजरनेम फीचर आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर प्रत्येकाला एक युनिक युजरनेम ठेवावे लागणार आहे, जसे आता ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आहे. वापरकर्त्यांनी हे फिचर सुरू केल्यानंतर, तुम्हाला कोणाला व्हॉट्सअॅपवर अॅ ड करण्याकरता नंबर देण्याची आवश्यकता नाही. नंबर नसतानाही तुम्ही इतरांना व्हॉट्सअॅपवर जोडू शकाल.   


एवढंच नाही, तर अनोळखी नंबरवरुन आलेला मेसेज तुम्ही वाचला आहात की नाही, हे त्या व्यक्तीला कळणार नाही. म्हणजेच, तुमचे रीड रिसिप्ट (ब्लू टिक) सुरू जरी असतील, तरीही अनोळखी व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक्स दिसणार नाहीत.


तुम्ही या व्यक्तीचा नंबर सेव्ह केला, किंवा त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला तरच तुम्ही मेसेज वाचला असल्याचं या व्यक्तीला कळणार आहे. तुम्हाला या व्यक्तीचे मेसेज नको असतील तर तुम्ही तिला ब्लॉक करू शकता. किंवा मग त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या मॉडरेटर टीमला रिपोर्टही करू शकता.


या फीचर्समुळे यूजरना अनोळखी नंबरवरुन होणारा त्रास कमी होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने गुरुवारी आपल्या यूजर्ससाठी व्हिडिओ मेसेजिंग फीचरही लाँच केलं होतं. या माध्यमातून यूजर्स आता ऑडिओ मेसेजप्रमाणे व्हिडिओ मेसेज पाठवू शकणार आहेत. 


तर काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने त्यांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे असाच एका अनोख्या फिचरबद्दल माहिती दिली होती की,  आता वापरकर्ते त्यांच्या चॅटवरच लहान आणि वैयक्तिक संदेश व्हिडीओद्वारे रेकॉर्ड करून तुमच्या प्रियजनांना पाठवू शकणारव आहेत. चॅटवर उत्तर देण्याचा हा एक प्रकारचा रिअल टाइम मार्ग असणार आहे. वापरकर्त्यांना 60 सेकंदांचा व्हिडिओ बनवण्याची संधी मिळेल आणि या 60 सेकंदात तुम्ही तुम्हाला हवे ते सांगून संदेश पाठवू शकता. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


AI Makes History: इतिहासात पहिल्यांदाच AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत; पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञानातील नव्या युगाची नांदी