WhatsApp HD Video Share Feature : लोकप्रिय मॅसेजिंग शेअरिंग अॅप व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूजर्ससाठी नेहमीच अपडेटेड फिचर्स घेऊन येतं. आतादेखील व्हॉट्सअॅपने असं एक नवीन फिचर लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपमध्ये कंपनीने लोकांना एचडी फोटो शेअर करण्याचे फीचर दिले आहे. लोकांना टप्प्याटप्प्याने हे अपडेट मिळत आहेत. या फीचरची माहिती मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी इंस्टाग्राम ब्रॉडकास्टद्वारे दिली. याबरोबरच त्यांनी असेही सांगितले की, लवकरच यूजर्सना HD क्वालिटीचे व्हिडीओ शेअर करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. आता हे फीचर देखील लाईव्ह होऊ लागले आहे. 9to5Mac च्या रिपोर्टनुसार, काही यूजर्सना HD व्हिडीओ शेअर करण्याचा पर्याय मिळू लागला आहे. या फीचरशी संबंधित एक फोटो देखील समोर आला आहे ज्यामध्ये दोन पर्याय व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.


या 2 पर्यायांमध्ये व्हिडीओ शेअर करता येईल


व्हॉट्सअॅप अपडेटनंतर, अॅपमध्ये व्हिडीओ शेअर करताना, यूजर्सना 2 पर्याय मिळतील ज्यामध्ये एक स्टॅंडर्ड आणि दुसरा एचडी व्हिडीओ क्वालिटीचा असेल. यूजर्स आपल्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडू शकतात. तुम्ही HD पर्याय निवडल्यास, तुमचे इंटरनेट सामान्यपेक्षा जास्त वेळ घेईल. त्यामुळे आवश्यकतेनुसार पर्यायांमध्ये स्विच करा.


तर, स्टॅंडर्ड व्हर्जन निवडल्यानंतर WhatsApp व्हिडीओवर प्रोसेस करते आणि 480p रिझोल्यूशनमध्ये पाठवते. तुमचे इंटरनेट कनेक्शन कमी असताना हा पर्याय निवडणे फायदेशीर ठरू शकतो. एचडी पर्यायामध्ये, कंपनी 720p रिझोल्यूशनमध्ये व्हिडीओ पाठवते जे अद्याप 1080p किंवा 4K पेक्षा खूपच कमी आहे परंतु त्याची क्वालिटी स्टॅंंडर्डच्या तुलनेत चांगली वाढते.   


नाव नसतानाही ग्रूप तयार करता येईल


लवकरच ग्राहक व्हॉट्सअॅपवर निनावी ग्रुप तयार करू शकणार आहेत. मात्र, अशा ग्रुपमध्ये फक्त 6 सदस्यच सहभागी होऊ शकतील. या फीचरची माहिती मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली होती. नाव नसलेल्या ग्रूपमधील प्रत्येकजण त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेल्या संपर्कांवर आधारित ग्रूपचे नाव पाहू शकतील. मात्र, अॅडमिनची इच्छा असल्यास ग्रुपचे नाव कधीही बदलता येईल. मार्क झुकरबर्ग यांनी पोस्टमध्ये असेही लिहिले आहे की, व्हॉट्सअॅप ग्रूपच्या आधारे ग्रूपचं नाव देण्यात येईल. पण, जर अॅडमिनला दुसरं नाव ठेवायचं असेल तर तुम्ही नावंही ठेवू शकता. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Google Job : दिवसाला फक्त एक तास काम आणि वर्षाला सव्वा कोटी पगार...गुगलचा हा कर्मचारी नेमकं करतो काय?