Worldwide Active users on Social Media : हातात मोबाईल असला की, त्यामध्ये न डोकावता आपल्याला क्षणभरही राहता येत नाही. कधी Whats App, कधी Facebook, कधी Instagram तर कधी इतर एखादं माध्यम वापरत त्या माध्यमातून नवनवीन गोष्टी Browse करत तुम्ही आम्ही अनेक तासांचा वेळ वाया घालवतो. मुळात इथं वेळ व्यर्थ असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. कारण, मोबाईल वापरताना त्यातून फारच कमी वेळ सत्कारणी लागतो ही बाबही नाकारता येत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा सोबतच आज इंटरनेट देखील सर्वांची गरज बनली आहे.असे बरेच लोक आहेत जे इंटरनेटशिवाय जगू शकत नाहीत. म्हणजेच दिवसभर इंटरनेटचा वापर केला नाही तर त्यांना अस्वस्थ वाटू लागते आणि काही जण विचित्र वागू लागतात. दरम्यान, जगभरातील सोशल मीडियावर सक्रिय लोकांची माहिती देणारा एक अहवाल समोर आला आहे. एएफपीच्या अहवालानुसार, जगातील एकूण लोकसंख्येपैकी 5.19 अब्ज लोक आज सोशल मीडियाचा वापर करत आहेत. म्हणजेच, जगातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या सोशल मीडियावर सक्रिय आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 3.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर लोक रोज किती वेळ घालवतात
एएफपीच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की दररोज लोक सोशल मीडियावर 2 तास 26 मिनिटे घालवतात, जे आधीपेक्षा खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार, ब्राझिलियन लोक सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवतात. त्यांचा दैनंदिन वापर वेळ सुमारे 3 तास 49 मिनिटे आहे, तर जपानी लोक दिवसातील 1 तासापेक्षा कमी वेळ सोशल मीडिया वापरतात.
हे 7 सोशल मीडिया अॅप्स जगभरात लोकप्रिय आहेत
Meta च्या अॅप्सवर जगभरातील लोक सर्वाधिक सक्रिय आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. यानंतर WeChat, TikTok आणि चीनचे Douyin प्रसिद्ध आहेत. मग ट्विटर, मेसेंजर आणि टेलिग्राम हे जगभर प्रसिद्ध आहेत. भारतातील मेटाच्या तिन्ही अॅप्सवर बहुतांश लोक सक्रिय आहेत. अलीकडेच कंपनीने थ्रेड्स अॅप देखील लॉन्च केले आहे. ज्याने 150 दशलक्ष युजरबेस ओलांडला आहे.
यापूर्वी एप्रिलमध्ये एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, जगभरात 5.18 अब्ज इंटरनेट वापरकर्ते आहेत. तर जगातील 60% लोक सोशल मीडियावर सक्रिय आहेत. 2021 नुसार सोशल मीडियावर 788.84 कोटी लोक सक्रिय होते. सध्या लोकसंख्या 800 अब्जांच्या पुढे गेली आहे.