WhatsApp QR Code Chat Transfer : आजच्या काळात सोशल मीडियाचा (Social Media) वापर प्रचंड वाढला आहे. सध्या जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सॲप (Whatsapp) वापरतो. व्हॉट्सॲपचे जगभरात करोडो युजर्स आहेत. यामुळेच कंपनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी व्हॉट्सॲपवर यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सॲपने आता आणखी एक नवीन फीचर आणलं आहे. या फिचरमुळे तुम्ही तुमचे चॅट्स अगदी सहजपणे आणि सुरक्षितरित्या ट्रान्सफर करू शकता.
व्हॉट्सॲपचं नवीन फीचर
मेटा (Meta) चे संस्थापक आणि सीईओ (CEO) मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी व्हाट्सॲपचं नवीन फिचर लाँच केलं आहे. मेटाने व्हाट्सॲप चॅट (WhatsApp) दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग शोधला आहे. व्हाट्सॲप युजर्स आता ॲपमधून बाहेर न पडता त्यांचा संपूर्ण चॅट आणि मीडिया दुसऱ्या डिव्हाइसमध्ये ट्रान्सफर करू शकतात.
आता व्हाट्सॲप चॅट ट्रान्सफर करणं सोपं
व्हॉट्सॲप चॅट्स दुसऱ्या फोनमध्ये हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर करण्यासाठी मेटाने QR-Code बेस्ड लोकल डेटा ट्रान्सफर फीचर लाँच केलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या जुन्या फोनचा चॅट हिस्ट्री तुमच्या नवीन फोनमध्ये ट्रान्सफर करू शकाल. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.
QR Code ने करा व्हॉट्सॲपचं चॅट ट्रान्सफर
मेटा कंपनीने म्हटलं आहे की, आता व्हॉट्सॲप युजर्स अनधिकृत ॲप्सद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यापेक्षा व्हॉट्सॲपवरच अधिक सुरक्षित आणि गोपनीयता पद्धतीने व्हॉट्सॲप चॅट ट्रान्सफर करु शकता. मेटा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी शुक्रवारी व्हॉट्सॲपवर QR-Code डेटा ट्रान्सफर फीचर लाँच केलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, ''तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स नवीन फोनवर हलवायचे असतील, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर अधिक खाजगीरित्या हे करू शकता.'' झुकरबर्गने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हॉट्सॲप युजर्स मोठ्या मीडिया फाइल्स आणि मीडिया देखील ट्रान्सफर करू शकतात.
क्यूआर कोडने चॅट ट्रान्सफर कसं कराल?
व्हॉट्सॲपने QR कोड वापरून जुन्या फोनवरून नवीन फोनमध्ये चॅट ट्रान्सफर करण्यासाठी खास फिचर लाँच केला आहे. जुन्या डिव्हाइसवरून नवीन डिव्हाइसवर WhatsApp चॅट ट्रान्सफर करण्यासाठी, आधी जुन्या डिव्हाइसवर WhatsApp उघडा आणि सेटिंग्ज > चॅट > चॅट ट्रान्सफर वर जा. यानंतर, युजर्सना चॅट ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन फोनवरून QR कोड स्कॅन करण्यास सांगितलं जाईल. यासाठी वाय-फाय (Wi-Fi) कनेक्शन आवश्यक आहे. या नवीन फिचरचा वापर करून तुम्ही चॅट ट्रान्सफर करण्यासाठी दोन्ही फोन चालू आहेत आणि एकाच Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट केलेले आहेत याची खात्री करून घ्या.