Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. मिलिंद हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. नेटकऱ्याच्या या कमेंटला मिलिंद यांनी रिप्लाय देखील दिला आहे.


मिलिंद गवळी यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, आनंद आपल्याला कशात आनंद मिळतो, काय केलं म्हणजे आपण आनंदी असतो, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात, काय ना खाण्यापिण्यामध्ये आनंद मिळतो, काय ना प्रेमाची माणसं भेटली की आनंद मिळतो, काही ना मनासारखे पैसे मिळाले की आनंद मिळतो, मला सुद्धा या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर आनंद मिळतो पण पण तितका नाही जितका मला मनासारखं काम करून मिळतो.' मिलिंद गवळी यांनी  शेअर केलेल्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे.


नेटकऱ्याची कमेंट 


एका नेटकऱ्यानं मिलिंद गवळी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट केली,'अजून किती खालच्या पातळीला जाऊन दुष्टपणाचा कळस गाठणार आहात? शेम शेम' या नेटकऱ्याच्या कमेंटला मिलिंद गवळी यांनी रिप्लाय दिला, 'नमिताला माहित असणार.' मिलिंद गवळी यांच्या या रिप्लायवर एका युझरनं कमेंट केली, ' ती, सीरिअल आहे. खऱ्या दहात मिलिंदजी खूप चांगले आहे. '








मिलिंद हे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. अनिरुद्ध  हा या मालिकेतील व्हिलन आहे. तो अरुंधती आणि इतरांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत असतो. अनिरुद्ध या भूमिकेमुळे मिलिंद गवळी यांना अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 


मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Milind Gawali: 'एक छोटीशी परी तुमच्या घरी येते आणि...'; लेकीच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळी यांची खास पोस्ट