Google Doodle: भारतातील पीएचडी मिळवणाऱ्या पहिला महिला म्हणून ज्यांचा गौरव करण्यात येतो त्या म्हणजे कमाला सोहनी. आज त्यांची 112 वी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने खास गुगलकडून डूडल (Google Doodle) बनवण्यात आले आहे. गुगलकडून शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांना श्रद्धांजली वाहत त्यांचे खाल डूडल बनवले आहे. कमला सोहनी यांनी भारताच्य बायोकेमिस्ट्री क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच त्यांनी भारतीय महिलांसाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी नवे मार्ग तयार करण्यास देखील मदत केली आहे.
कोण आहेत कमला सोहनी?
18 जून 1911 इंदूरमध्ये कमला यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल डॉ. सोहोनी हे देखील प्रतिष्ठित केमिस्टच्या कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांच्या आणि काकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुंबई विद्यापिठातून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर 1933 मध्ये या विषयांत त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर सर्व जुन्या विचारांना आणि रुढी पंरपरांना भेदत त्यांनी प्रवेश मिळवला.
तेव्हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांना त्यांच्या तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिलांवर लादण्यात आलेल्या कठोर अटी नियमांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या क्षमतांबद्दल शंका निर्माण करण्यात येत होती. परंतु त्यांनी त्यांच्या जिद्दीने आणि ध्येयाने हे सर्व अडथळे पार केले. त्यानंतर संस्थेच्या संचालकांनी देखील त्यांच्या जिद्दीचे आणि ध्येयाचे कौतुक केले. त्यांच्या या कतृत्वामुळे महिलांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दारं उघडण्यात आली.
त्यानंतर पुढील काही वर्ष डॉ. सोहोनी यांनी शेंगांमध्ये असलेल्या प्रथिने आणि त्याच्या पोषणामुळे विशेषत: मुलांवर होणारा परिणाम यावर संशोधन केले. त्यांच्या निष्कर्षांनी बायोकेमिस्ट्रीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आणि पोषण वाढवण्यासाठी शेंगांचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे.
1937 मध्ये डॉ. सोहोनी यांना केंब्रिज विद्यापीठात संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाली, तिथे त्यांनी एक महत्त्वाचा शोध लावला. त्यांनी सायटोक्रोम सी चा शोध लावला आणि त्याचा अभ्यास केला. यामुळे ऊर्जा निर्मितीसाठी मदत होते आणि वनस्पतीच्या सर्व पेशींमध्ये हे आढळून येते. चौदा महिन्यांच्या कमी कालावधीत त्यांनी या महत्त्वपूर्ण शोधावर अभ्यास पूर्ण केला. डॉ. सोहोनी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. तसेच मुंबईतील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या त्या पहिल्या महिला संचालक राहिल्या आहेत.