Realme  spying over :  सध्या  मोबाईल वापरणाऱ्या लोकांचा खाजगी डेटा सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे.  नुकतंच  ट्विटरवर ऋषी बागरी (Rishi Bagree) नावाच्या  एका व्यक्तीने माहिती तंत्रज्ञान मंत्री चंद्रशेखर राजीव चंद्रशेखर यांना एक ट्वीट केलं आहे.


खरंतर तुम्ही जो स्मार्टफोन वापरत आहात तो तुमच्या डेटाला बाय डिफॉल्ट ट्रॅक करू शकतो. कारण तुम्हाला स्मार्टफोन  वापरल्याचा अनुभव आणखीन चांगला व्हावा. याचा अर्थ या मोबाईल कंपन्यां तुमच्या डेटावर पाळत ठेवून आहेत. एका ट्विटर यूजर्सने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, त्याच्या जवळ रियलमी'चा (Realme phone) असून त्यामध्ये बाय डिफॉल्ट Enhanced Intelligent Service या नावाचे फिचर सुरू आहे. हे फिचर लोकांचा डेटा गुप्तपणे ट्रॅक करत आहे. तुमच्या स्मार्टफोनमधील एसएमस, कॉल, ई-मेल किंवा याशिवाय इतर गोष्टींना तुमचा फोन सर्व वाचत, पाहत आहे. 


याचा तात्काळ तपास करण्याचे आदेश


जेव्हा हे ट्वीट व्हायरल झालं तेव्हा केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी आयटी मंत्रालयाला त्याचा (Meity Ministry of Electronics & IT) तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या ट्वीटवर अनेक लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आणि कंपनीच्या या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. एका यूजर्सने तर आपल्या वनप्लस फोनचा स्क्रिनशॉर्टही शेअर केला आहे, ज्यामध्ये  Enhanced Intelligent Service या नावाचे फिचर आधीच सुरू आहे. याचा उद्देश असा होता की, हे फिचर बाय डिफॉल्ट ऑन ठेवल्यामुळे यूजर्सना स्मार्टफोनचा चांगला अनुभव यावा. हे फिचर डिव्हाईसची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. यासोबत सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स, इंटरनेट यूजेस, एसएमस, लोकेशन आणि इतर सर्व गोष्टींवर पाळत ठेवली जाते.  आता या ट्विटवर यूजर्स संताप व्यक्त करत  आहेत आणि यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आहेत. 






तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे फिचर ऑन तर नाही ना?


जर तुम्ही रियलमी, वनप्लसचा स्मार्टफोन वापर करत असाल, तर तुमच्या स्मार्टफोनमध्येही ही सेटींग बाय डिफॉल्ट ON  आहे की Off हे पुढील प्रमाणे पाहा...


सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये एन्टी करा. यानंतर सिस्टीम सर्व्हिसमध्ये प्रवेश करा. यानंतर तुम्हाला Enhanced Intelligent Service  हा पर्याय मिळेल, जो बाय डिफॉल्ट ऑन असेल. 


खरंच डेटा टान्स्फर होत आहे का ?


या ट्वीटला री-ट्वीट करत काही यूजर्सकडून रियलमी कंपनी आणि सरकारला प्रश्न विचारत आहेत की, आपल्या सगळ्यांचा डेटा चीनला ट्रान्स्फर होत नाही ना?  परंतु आता या प्रकरणाचा सरकारने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सरकारकडून लवकरच स्पष्टकरण देण्यात येईल.


इतर महत्वाच्या बातम्या वाचा :


Realme C55 भारतात लॉन्च, कमी किमतीत जबरदस्त फोन; बुकिंग सुरू