Finance Ministry Warns Dating App Users : सध्याचा जमाना ऑनलाइनचा आहे. त्यामुळे सगळं काही ऑनलाइन सुरू आहे. तुमचे जर ब्रेकअप झाले असेल तर तुम्ही काही बेस्ट डेटिंग ॲप्सच्या मदतीने आपला पार्टनर शोधू शकता. याचमुळे आजकाल तरूण पिढीमध्ये आॅनलाईन डेटिंग अॅप्सचे मोठे क्रेझ पाहायला मिळते. भारतीय डेटिंग अॅप्स मार्केटमध्ये जबरदस्त लोकप्रिय होताना आता दिसत आहेत. डेटिंग अॅप्समुळे हजारो लोक एकमेकांशी जोडले जातात. अनेकजण या अ‍ॅप्सचा नवीन जोडीदार, पार्टनर शोधण्यासाठी वापर करतात. तर काहीजण आपली ओळख लपवून बनावट आयडीद्वारे देखील या अ‍ॅप्सचा वापर करताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का? Tinder किंवा Bumble सारखी डेटिंग अॅप्स असोत किंवा Shaadi.com किंवा Jeevansathi.com सारखी मॅट्रिमोनियल साइट्स असोत, आजकाल या साइट्स स्कॅमर लोकांकरता लोकांना फसवण्याचे एक हत्यार झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आॅनलाईन फ्राॅडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक घोटाळेबाज या आॅनलाईन अॅप्सच्या मदतीने अनेकांंना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि पैसे लुटण्याचे काम करत आहेत. 


66 टक्के लोक आजवर आॅनलाईन फ्राॅडचे  बळी 


डेटिंग अॅप्स आणि मॅट्रिमोनियल साइट्स इत्यादी आॅनलाईन प्लॅटफाॅर्मवर स्कॅमर लोकांचे मोठे जाळे आहे. ते या जाळ्यात अनेक लोकांना अडकवतात. एका रिपोर्टनुसार जवळपास 66% लोक या स्कॅमरच्या जाळ्यात अडकले आहेत. वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, वित्त मंत्रालयाने अलीकडेच मॅट्रिमोनिअल डेटिंग स्कॅम्सशी संबंधित एक अॅडव्हायझरी जारी केली आहे.






मिळालेल्या माहितीनुसार, आता घोटाळेबाज एका वेगळ्या प्रकारच्या युक्तीने लोकांना त्यांच्या जाळ्यात  अडकवत आहेत. ज्यामध्ये ते प्रथम लोकांना ऑनलाइन भेटतात आणि नंतर त्यांचे मित्र किंवा प्रियकर असल्याचे भासवून त्यांना भेटवस्तू पाठवण्यास सांगतात. त्यानंतर त्याला विमानतळावर कस्टम ड्युटी फी भरण्यास सांगितले जाते जेणेकरून त्याला भेटवस्तू मिळू शकेल. ही घटना खरी असल्याचे त्या व्यक्तीला वाटते आणि मागितलेली सर्व रक्कम विश्वास ठेऊन समोरचा व्यक्ती देतो. अर्थ मंत्रालयाने लोकांना अशा घोटाळ्यांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच अशा प्रकारे पैसे जमा करण्यासाठी विभागाकडून कोणत्याही व्यक्तीला संदेश किंवा खात्याचा तपशील पाठवला जात नाही, असेही सांगण्यात आले आहे. 


भारतात Tinder, Bumble, Badoo, woo सारख्या अ‍ॅप्सची लोकप्रियता प्रचंड आहे. Tinder हे Dating App भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. या Dating सर्विसला वर्ष 2012 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि हे 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Assam Flood : आसाममध्ये 'जलप्रलय'! सुमारे 30 हजार लोकांना फटका, 175 गावं पाण्याखाली