Instagram New Feature : इन्स्टाग्राम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. नुकतंच Meta ने Instagram यूजर्ससाठी एक नवीन फिचर आणलं आहे. या नवीन फिचरच्या माध्यमातून यूजर्सना एकापेक्षा जास्त ग्रिड पोस्टमध्ये म्युझिक वापरता येणार आहे. म्हणजेच, यूजर्स एकापेक्षा जास्त फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करून त्यांना म्युझिक जोडू शकतात. आतापर्यंत फक्त सुरुवातीच्या एका फोटोमध्ये म्युझिक अॅड करण्याचा पर्याय होता. बाकीचे फोटो ऑडिओशिवाय दिसत होते. पण आता यूजर्स सर्व पोस्टना म्युझिक जोडू शकतात. अमेरिकन गायक-गीतकार ऑलिव्हिया रॉड्रिगो यांनी शुक्रवारी हे फिचर सादर केले, असे द व्हर्जच्या वृत्तात म्हटलं आहे.
इन्स्टाग्रामने हे नवीन फिचर अॅड केलं असलं तरी यूजर्स संपूर्ण पोस्टमध्ये फक्त एक गाणं जोडू शकतात. म्हणजे सर्व फोटोंमध्ये निवडलेलं एकच म्युझिक सुरु राहील. प्रत्येक फोटोसाठी स्वतंत्र गाण्यांचा पर्याय सध्या उपलब्ध नाही. नवीन फिचर हे टप्प्याटप्प्याने जारी केले जाणार आहे. यूजर्सना हळूहळू या संधीचा लाभ घेता येणार आहे.
लवकरच हे फीचर देखील उपलब्ध होणार आहे
Instagram लवकरच Add Yours स्टिकर फीचर रिलीज करणार आहे. या फिचरच्या मदतीने, जर एखाद्या फॅन क्रिएटरने प्रॉम्प्टवर रील बनवला तर त्याला क्रिएटर पृष्ठावर हायलाइट होण्याची संधी मिळेल. जेव्हा क्रिएटर त्या रीलला हायलाईट करेल तेव्हा हे होईल. क्रिएटर एकूण 10 रील हायलाईट करू शकतात. एखाद्या चाहत्याची रील हायलाइट झाल्यावर त्याला त्याची माहिती मिळेल.
याशिवाय, यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी Instagram DM मध्ये निर्बंध लादणार आहे. लवकरच नॉन-फॉलोअर्स समोरच्या युजरला एका दिवसात फक्त एक मेसेज पाठवू शकतील. मेसेज देखील फक्त मजकूर असेल. जर तुमची मेसेज रिक्वेस्ट स्वीकारली गेली तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ मेसेज पाठवू शकता. रिक्वेस्ट स्वीकारल्याशिवाय, तुम्ही एका दिवसात फक्त एकच मेसेज पाठवू शकाल.
महत्त्वाच्या बातम्या :