Gadar 2 Leaked Online : अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सनीचे चाहते काही दिवसांपासून या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 'गदर 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असला तरी रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.


 'गदर 2' या सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान सनी देओलचा  'गदर 2' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे. 'गदर 2' हा सिनेमा पायरसीचा शिकार झाला आहे. त्यामुळे सिनेमाच्या कमाईवर यासर्व गोष्टींचा चांगलाच परिणाम होणार आहे.


अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केलेली 20 लाखांपेक्षा अधिक कमाई


सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha patel) यांचा 'गदर 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासूनच या सिनेमाची चाहत्यांमध्ये क्रेझ होती. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने 20 लाखांपेक्षा अधिक कमाई केली होती. पण आता 'गदर 2' हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा तमिलरॉकर्स, मूवीरूल्ज, फिल्मजिला, टेलीग्राम यांसारख्या साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे. 






तगडी स्टारकास्ट असलेला 'गदर 2'


सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.


'गदर 2'चं कथानक तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत सिंह यांच्याभोवती फिरणारं आहे. 'गदर'मध्ये तारा सिंह आणि सकिनाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. पण आता प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागात त्यांच्या मुलावर भाष्य करण्यात आले आहे. 'गदर 2' हा सिनेमा सिने-प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.


संबंधित बातम्या


Gadar 2 Movie Review : सनी देओलचा 'गदर 2' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...