App Store Award winners : Google नंतर, Apple ने भारतासाठी App Store च्या सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्स 2022 ची यादी जारी केली आहे. या यादीमध्ये 2022 वर्षी एकूण 16 अ‍ॅप्स आणि गेम्सने या यादीत स्थान मिळवले.  


एकूण 16 अ‍ॅप्स आणि गेम्सचे या यादीत स्थान 
Apple ने मंगळवारी 2022 साठी App Store पुरस्कारांची घोषणा केली. अॅप स्टोअरच्या सर्वोत्कृष्ट अॅप्स आणि गेम्स 2022 च्या यादीमध्ये अॅप्स विभागात, फ्रेंच सोशल मीडिया अ‍ॅप, BeReal ने विजेते म्हणून स्थान मिळवले. त्याचप्रमाणे GoodNotes 5 हे या वर्षाचे आयपॅड अॅप बनले. MacFamilyTree 10 हे 2022 चे सर्वोत्कृष्ट मॅक अॅप निवडले गेले, ViX ची ऍपल टीव्ही अ‍ॅप म्हणून निवड झाली. 2022 साठी जेंटलर स्ट्रीक ऍपल वॉच अॅप म्हणून विजेते ठरले. गेमिंगमध्ये, 'एपेक्स लेजेंड्स मोबाइल' ला आयफोन गेम ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले. मॉनकेज हा iPad यूजर्समध्ये आवडता होता, 2022 साठी Inscryption हा Mac सर्वोत्कृष्ट गेम बनला, Apple TV वरील El Hijo ला सर्वाधिक पसंती मिळाली, Wylde Flowers ला Apple Arcade गेम ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आणि League of Legends Esports Manager 2022 चा चायना गेम विजेता ठरला.


आयफोन अ‍ॅप ऑफ द इअर : BeReal
BeReal एक वेगळ्या प्रकारचे फोटो शेअरिंग अॅप आहे. याच्या माध्यमातून अ‍ॅप यूजरला एकाच वेळी दोन मिनिटांच्या अंतराचा फोटो घेऊन शेअर करता येतो. अॅप डेव्हलपरचे म्हणणे आहे की याच्या मदतीने तुमच्या दैनंदिन जीवनात तुमचे खरे मित्र कोण आहेत हे ओळखता येते.


 


आयपॅड अ‍ॅप ऑफ द इयर:  गुड नोट्स 5
ज्यांना त्यांचा iPad डिजिटल व्हाईटबोर्ड म्हणून वापरायचा आहे त्यांच्यासाठी GoodNotes 5 हे एक उत्तम अॅप आहे. हॅंडरिटन नोट्स, डिटेल्ट डॉक्यूमेंट, PDF  मार्कअप करू शकतात.


Apple टीव्ही अ‍ॅप ऑफ द इयर: ViX


हे एक स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. अनेक तासांचे चित्रपट, टीव्ही शो आणि स्पॅनिशमधील कंटेटसह उपलब्ध आहे. हे अॅप भारतात उपलब्ध नसले तरी ते काही विशिष्ट प्रदेशांपुरतेच मर्यादित आहे.


ऍपल वॉच अ‍ॅप ऑफ द इयर: जेंटलर स्ट्रीक
ऍपल वॉचमध्ये थर्ड-पार्टी फिटनेस अ‍ॅप्स आहेत, ज्यात 'ट्विस्ट' या जेंटलर स्ट्रीकचा समावेश आहे. फिटनेस आणि आराम यांच्यातील योग्य संतुलन राखण्यात हे अॅप मोठ्या प्रमाणावर मदत करते. अ‍ॅप डेली वर्कआऊट  सुचवते जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.



Apple ने त्यांच्या 2022 App Store पुरस्कारांचे विजेते घोषित केले आहेत,  सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्स आणि गेम निवडण्याव्यतिरिक्त, Apple च्या App Store संपादकांनी पाच कल्चरल इंपॅक्ट विजेते निवडले, ज्यांनी लोकांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आणि संस्कृतीवर प्रभाव टाकला. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक म्हणाले, “या वर्षीच्या अ‍ॅप स्टोअर पुरस्कार विजेत्यांनी नवीन, विचारशील, वास्तविक दृष्टीकोन आणि एक वेगळाच अनुभव अनुभवला आहे. "या पुरस्कार विजेत्या अ‍ॅप्सबाबत बोलायचे झाले तर, स्वत: शिकलेल्या एकट्या निर्मात्यांपासून ते जगभरात पसरलेल्या आंतरराष्ट्रीय टीमपर्यंत, हे उद्योजक अर्थपूर्ण प्रभाव पाडत आहेत. तसेच अॅप्स आणि गेम आपल्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव टाकतात याचाही अनुभव मिळाला,"