Meta:  जगभरातील युजर्ससाठी फेसबुक (Facebook), व्हाॅट्सअॅप (Whatsapp) ही माध्यमं फार महत्त्वाची झाली आहेत. लोकं त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट हल्ली सोशल मिडीयावर शेअर करतात. ही माहिती त्यांची त्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमांवर सहज उपलब्ध होते. परंतु लोकांची हीच माहिती चोरीला जाण्याची देखील तितकीच शक्यता असते. पण आता तीच भीती खरी होण्याचं चित्र पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटा (Meta) या कंपनीला युरोपियन युनियनने 1.2 अब्ज डॉलरचा दंड आकरला आहे. युरोपियन युनियनच्या म्हणण्यानुसार,  'मेटा त्यांच्या युजर्सची व्यक्तिगत माहिती सुरक्षित करण्यास अपयशी ठरले आहे.' तसेच युरोपियन युनियनने मेटाच्या युजर्सचा डेटा अमेरिकेत जाण्यापासून थांबण्याचे देखील निर्देश दिले आहेत. आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने केलेल्या घोषणेनुसार त्यांनी म्हटले आहे की, सोशल नेटवर्क मधील एका दिग्गज  कंपनीने त्याच्या युजर्सचा व्यक्तीगत डेटा अमेरिकेत पोहचवणे सुरु ठेवले आहे. तसेच हे युजर्सच्या मुलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याला धोका निर्माण करु शकते असे देखील त्यांनी म्हटले आहे. 


तसेच या संस्थेला अशी देखील भिती आहे की, जर युजर्सचा हा डेटा अमेरिकेत पोहचला तर तो संपूर्ण डेटा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांपर्यंत पोहचू शकतो. युरोपियन युनियने याआधी देखील असाच दंड अॅमेझॉनला ठोठावला होता. अॅमेझॉनला ठोठावण्यात आलेल्या दंड हा 6,680 कोटी रुपये इतका होता. परंतु मेटावर लावण्यात आलेला हा दंड अॅमेझॉनपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मेटा आता या निर्णयाविरोधात न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचं देखील मेटाकडून सांगण्यात येत आहे. 


तसेच आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने मेटाला त्यांच्या युजर्सचा डेटा अमेरिकेत जाण्यापासून थांबवण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी दिला आहे. तसेच अमेरिकेत अवैध पद्धतीने साठवला जाणारा डेटा घालवण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मेटाला देण्यात आला आहे. 


मेटाकडून सर्वेक्षणाला सुरुवात


मेटाकडून यासंबंधी सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून आता ट्विटरपाठोपाठ मेटाने देखील पेड वेरिफीकेशनची सेवा सुरु केली आहे. याच अंतर्गत आता युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्रमावर पेड ब्लू टिक घेऊ शकतात. त्यामुळे आता ट्विटरनंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील ब्लू टिक मिळवण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. संकेतस्थळ असणाऱ्या लोकांना 1,099 रुपये तर मोबाईल युजर्सना 1,450 रुपये मेटाकडून आकारण्यात येणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Twitter New Feature : आता YouTube-Netflix सारखे ट्विटरवरही व्हिडीओ पाहता येणार? Elon Musk यांनी लाँच केले ट्विटर दोन भन्नाट फिचर