Twitter New Feature :  ट्विटरची मालकी स्विकारल्यापासून इलॉन मस्क यांनी ट्विटरचा चेहेरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एके काळी ट्विटरला मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जात होते. परंतु इलॉन मस्क यांनी ट्विटरची ही मूळ ओळख बदलण्यासाठी सातत्याने नवनवीन घोषणा करता दिसून येतात. मस्क यांच्याकडून लवकरच व्हॉट्सअॅपवर असणारे एक फिचर लाँच करण्यात येणार आहे. याआधी मस्क यांनी नेटफ्लिक्स आणि युट्युबसारखं (YouTube-Netflix ) फिचर लाँच केलं होतं. आता  ट्विटरवरील ब्लू टीक युजर्सना दोन तासापर्यंत व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मस्क यांनी घोषणा केली आहे. या नवीन फिचरच्या लाँचिंगनंतर अनेक युजर्सनी ट्विटरवर चित्रपटही अपलोड केले आहेत. परंतु, सध्या मस्क यांनी एक नवीन भन्नाट फिचर आणले आहे. हे नवीन फिचर युट्युब-नेटफ्लिक्ससारखं असणार आहे.  या फिचरविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...


आता व्हिडीओ स्क्रोल करत पाहता येणार


आता ट्विटरवरही येणाऱ्या काळात युट्युबसारखं व्हिडीओ स्क्रोल करत व्हिडीओ पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून  ट्वीट करत सांगितले की, लवकरच सर्व प्रेक्षकांसाठी पिक्चर इन पिक्चर मोड घेऊन येणार आहेत. 


15 सेकंदाचा  फॉरवर्ड आणि बॅकवर्ड पर्याय मिळणार


पिक्चर इन पिक्चर मोडबद्दल इलॉन मस्क यांनी ट्विटरवर एका युजर्सच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती शेअर केली आहे. याबाबत त्यांना ट्विटरवर एका युजरने विनंती केली की, कृपा करून 5 सेकंदाचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करण्याचा सिक बटण देऊन टाका. यावर मस्क यांनी प्रतिसाद देताना सांगितले की, 15 सेकंदाचा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करण्याचा सिक फिचर पुढील आठवड्यात ट्विटरवर उपलब्ध होणार आहे. यासोबत युजर्सना व्हिडीओ पाहताना पिक्चर इन पिक्चर मोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.





 


ट्विटरला नवीन सीईओ


दरम्यान, आता ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो या पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी याकारिनो यांनी एनबीसी युनिव्हर्स या अमेरिकन टिव्ही नेटवर्कच्या ग्रुपमध्ये तब्बल दोन दशके काम केलं आहे. त्यांना काही दिवसापूर्वी ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटरव्दारे नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटद्वारे सांगितले की, ट्विटरच्या नवीन सीईओच्या नावाचा खुलासा केला होता आणि त्या काही आठवड्यातच ट्विटरची जबाबदारी स्वीकारणार आहेत.


ही बातमी वाचा 


Elon Musk यांनी ट्विटरची 'ही' सेवा केली बंद, आता युजर्सना करावं लागणार हे काम