Tata Group iPhone: भारतात आयफोनची निर्मिती करणारी टाटा (Tata Group) ही पहिली कंपनी ठरणार आहे. टाटा समूह ऑगस्टपर्यंत अमेरिकेची दिग्गज कंपनी अ‍ॅपलसोबत आयफोन (iPhone) बनवण्यासंदर्भात डील करणार आहे. डील केल्यानंतर टाटा समूह आयफोन उत्पादनासाठी भारतात मोठं प्लाट/फॅक्टरी सुरू करणार आहे.


अ‍ॅपल या कंपनीने आता चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्येही आयफोनचे म्यॅन्युफॅक्चरिंग विकसित करण्यावर भर दिला आहे. अ‍ॅपलसाठी चीनला पर्याय ठरणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा समुहाच्या कंपनीचा समावेश आहे. टाटा कंपनीच्या या निर्णयामुळे भारतातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार आहे. 


अ‍ॅपल कंपनीसोबत करार केल्यानंतर टाटा समूह कर्नाटकातील विस्ट्रॉन कॉर्प फॅक्टरी (Wistron Corp. factory) खरेदी करणार आहे, ज्याची अंदाजे किंमत 4 हजार 940 करोड रुपयांहून अधिक असेल. या कंपनीत 10 हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात, जे सध्या लेटेस्ट iPhone 14 मॉडेल बनवत आहेत. 


प्लांटमध्ये बनणार 14 हजार 822 करोड रुपयांचे आयफोन 


विस्ट्रॉनने राज्य सरकारकडूनआर्थिक प्रोत्साहन मिळवण्यासाठी मार्च 2024 या आर्थिक वर्षात फॅक्टरीतून किमान 14 हजार 822 करोड रुपयांचे आयफोन पाठवण्याचं वचन तयारी दर्शवली आहे. तसेच पुढील वर्षी प्लांटची कर्मचारी संख्या तिप्पट करण्याची योजना देखील आखली आहे. विस्ट्रॉन भारतातील आयफोन व्यवसायातून बाहेर पडल्याने टाटा कंपनी आता पुढील कारभार सांभाळणार आहे.


अ‍ॅपल कंपनीला होणार फायदा


भारतात आयफोनची निर्मिती सुरू झाल्याने अ‍ॅपल कंपनीला चीनच्या पलीकडे इतर आशियाई देशांमधूनही फायदा मिळेल. विस्ट्रॉनने 30 जून रोजी संपलेल्या करारापर्यंत तीन महिन्यात 4 हजार 117 करोड रुपयांचे आयफोन निर्यात केले. अ‍ॅपलचे इतर प्रमुख तैवानी पुरवठादार, फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुप (Foxconn Technology Group) आणि पेगाट्रॉन कॉर्प (Pegatron Corp.) यांनी देखील स्थानिक पातळीवर पुरवठ्यात वाढ केली आहे.


चीनमधून अ‍ॅपलचा काढता पाय?


अ‍ॅपलचं सर्वात मोठं मॅन्युफॅक्चरिंगचं काम हे सध्या चीनमधून केलं जात आहे. पण चीनमधील कोविड लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावर बदलती भूमिका आणि वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील वाढत्या तणावानंतर अ‍ॅपलने चीनपासून दूर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले ​​आहेत. अ‍ॅपलकडून म्यॅन्युफॅक्चरिंगसाठी इतर पर्यायांची चाचपणी सुरू आहे. अ‍ॅपलने पूर्वीच्या कामाच्या तुलनेत सध्या चीनमधून आपलं उत्पादन कमी केलं आहे. इतर देशांमध्ये म्यॅन्युफॅक्चरिंगचं काम सुरू करण्यात आलं आहे. भारत हा त्यासाठी एक पर्याय बनला असून भारतात भविष्यात अ‍ॅपलचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जाऊ शकतं. 


हेही वाचा:


Ghaziabad: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू