What Is ClearFake : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक (Deepfake) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या मात्र हे संकट इथेच थांबत नाही तर यापुढे आता क्लिअरफेकचा (ClearFake) धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी लोकांना डीपफेकबाबत इशारा दिला आहे. AI वापर करून सोशल मीडियावर फेक व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना कारवाई करून कडक कायदे करण्यास सांगितले आहे. कंपन्या या दिशेने काम करत आहेत. दरम्यान, संशोधकांनी क्लिअरफेकबाबत लोकांना सावध केले आहे. क्लिअरफेक म्हणजे काय आणि ते लोकांचे कसे नुकसान करत आहे हे जाणून घेऊया...


क्लिअरफेक म्हणजे काय?



क्लिअरफेक देखील डीपफेकसारखेच आहे. यातही  AI च्या माध्यमातून बनावट व्हिडिओ, फोटो, वेबसाईटचा वापर करून  लोकांना जाळ्यात अडकवतात. यामाध्यमातून चुकीची माहिती, व्हिडीओ, फोटो आणि मालवेअर लोकांपर्यंत पोहोचवले जातात. क्लिअरफेकचा वापर करून सायबर भामटे लोकांच्या सिस्टीममध्ये चुकीचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत आहेत आणि नंतर सिस्टीममधून त्यांची वैयक्तिक माहिती चोरत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, संशोधकांनी एक नवीन सायबर धोका, अॅटॉमिक macOS स्टॉकर (एएमओएस) शोधला, जो प्रामुख्याने अॅपल वापरकर्त्यांना लक्ष्य करणारा अत्याधुनिक मालवेअर आहे. एकदा वापरकर्त्याच्या सिस्टममध्ये स्थापित केल्यानंतर, यात iCloud कीचेन पासवर्ड, क्रेडिट कार्ड तपशील, क्रिप्टो वॉलेट आणि इतर फायलींसह संवेदनशील माहिती काढण्याची क्षमता आहे.


हा मालवेअर आधीपासूनच युजर्ससाठी धोकादायक होता, पण आता क्लिअरफेकच्या माध्यमातून सायबर भामटे हा मालवेअर लोकांच्या सिस्टीममध्ये टाकत आहेत. क्लिअरफेकचा वापर करून आता बनावट वेबसाइट तयार करून युजर्सला ब्राउझर अपडेट करण्यास सांगत आहेत. या वेबसाइट्स आणि प्रॉम्प्ट अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत की वापरकर्त्यांना वेबसाइट पूर्णपणे सुरक्षित आहे असे वाटेल. सिस्टीममध्ये एएमओएस इन्स्टॉल होताच सर्व प्रकारची माहिती गोळा करण्यास सुरुवात होते आणि यामुळे युजर्सची प्रायव्हसी संपुष्टात येते. माहिती मिळवून सायबर भामटे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे लोकांना टार्गेट करतात.


सुरक्षित कसे रहावे?


-असे हल्ले टाळण्यासाठी नेहमी अधिकृत संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डाऊनलोड करा. 
-कोणत्याही थर्ड पार्टीचे कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू नका.
-आपले सॉफ्टवेअर अप-टू डेट ठेवा.
-तसेच macOS गेटकीपर सिक्युरिटीला बायपास करण्यास सांगणाऱ्या अॅप्सपासून सावध राहा आणि ते इन्स्टॉल करू नका.


इतर महत्वाची बातमी-


iPhone 16 feature leaks : iPhone 16चे फिचर्स leaks?, iPhone 16 कसा दिसेल? कधी होणार लॉंच? डिस्प्लेपासून बॅटरी लाइफपर्यंत, संपूर्ण माहिती एका क्लिकवर...