How To Blur WhatsApp Chats : सध्या सगळ्याच वयोगटातील लोक (WhatsApp) व्हॉट्सअॅप वापरतात. त्यात अनेक लोक कामासंदर्भात बोलत असतात तर अनेक लोक काही खासगी चर्चादेखील करत असतात. काही गोष्टी प्रचंड वैयक्तिक असतात. त्यामुळे या चॅट कोणीही वाचू नये, असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे या चॅट लपवण्यासाठी आपण आयराईव्हमध्ये ठेवत असतो. सर्च केलं तरीही या चॅट सगळ्यांना दिसत असते. मात्र जर तुम्हाला खासगी चॅट लपवायच्या असतील तर तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहोत. ही ट्रिक वापरुन तुम्ही खासगी चॅट ब्लर करु शकता. कोणती आहे ही भन्नाट ट्रिक पाहुयात...


व्हॉट्सअॅपवरील चॅट कसे लपवायचे?


व्हॉट्सअॅपवरील चॅट लपवणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक्सटेंशन गरज लागणार आहे. व्हॉट्सअॅपसाठी प्रायव्हसी एक्सटेंशन ब्लर मेसेजेस असे त्याचे नाव आहे. ते कसं काम करतं तेही जाणून घेऊया.


-व्हॉट्सअॅपसाठी प्रायव्हसी एक्सटेंशन ब्लर मेसेजेसवर क्लिक केल्यावर क्रोम वेब स्टोअर ओपन होईल.


-उजवीकडे अॅड टू क्रोमचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर वर अॅड एक्सटेंशनचा पॉप-अप दिसेल. त्यावर क्लिक करा.


-ते डाऊनलोड होताच यूआरएलच्या बाजूला एक्सटेन्शनचा लोगो दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही टॉगल चालू करा.


-आता व्हॉट्सअॅप वेबवर गेल्यावर तुम्हाला सर्व चॅट ब्लर दिसतील. जेव्हा आपण वैयक्तिक चॅटवर क्लिक कराल तेव्हा ते फक्त आपल्याला दिसेल.


 


याशिवाय व्हॉट्सअॅप चॅट ब्लर करण्याचे अनेक पर्याय आहेत. जसे की WA Web Plus for WhatsApp. हादेखील एक एक्सटेन्शन आहे, ज्याच्या मदतीने सर्व चॅट ब्लर होतील. चला जाणून घेऊया ते कसे कराल... 


-व्हॉट्सअॅप एक्सटेंशनसाठी WA Web Plus for WhatsApp कसे वापरावे.


-सर्वप्रथम क्रोम वेब स्टोअर उघडा, त्यानंतर व्हॉट्सअॅपसाठी डब्ल्यूए वेब प्लस सर्च करा.


-Add To Chrome बटणावर क्लिक करा.


-त्यानंतर टूलबारवर एक्सटेंशनचा नवा शॉर्टकट दिसेल.


-व्हॉट्सअॅप लाँच करण्यासाठी शॉर्टकटवर क्लिक करा.


-एक्सटेंशनचा मेनू उघडण्यासाठी पुन्हा शॉर्टकटवर क्लिक करा.


या दोन्ही ट्रिक वापरुन तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट ब्लर करु शकता. या दोन्ही ट्रिकमुळे तुमची खासगी माहिती दुसऱ्याला दिसणार नाही आणि सोबतच प्रायव्हसी मेन्टेन ठेवता येईल.


इतर महत्वाची बातमी-


Smartwatch Features : Smartwatch खरेदी करताय? जरा थांबा, या 5 गोष्टी आधी चेक करा, नाहीतर सगळे पैसे पाण्यात गेले म्हणून समजा!