iPhone 16 feature leaks : iphone 15 लाँच होताच iphone 16 ची चर्चा जोरात सुरू आहे. iphone 15 बाजारात येताच त्याची विक्री अतिशय वेगाने झाली. अनेकांनी  iphone 15 विकत घेतला, iphone 15 चं कौतुक केलं... तर काही लोकांनी त्याबद्दल वाईट रिव्हूव्ह दिले. पण आता आयफोन 15 नंतर आयफोन 16 ची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याचे लाँचिंग 2024 मध्ये होणार आहे, असं बोललं जात आहे. यासंदर्भात कंपनीने अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही आहे.  iphone 16 लाँच होण्यापूर्वीच त्याची झलक, फीचर्स, डिझाइन आणि लूक समोर आला आहे.  आयफोन 16 मध्ये यावेळी नेहमी मोठा डिस्प्ले मिळू शकतो. हे बेस मॉडेल्ससाठी असले तरी प्रो मॉडेल्समध्ये थोडे मोठे डिस्प्ले पॅनेल मिळू शकतात. याशिवाय आयफोन 16 च्या बॅटरीमध्ये जोरदार बदल होऊ शकतो.


पाहूयात आयफोन 16 च्या बॅटरीबाबत काय अफवा आहेत. 


आयफोन 16 मध्ये डिस्प्ले कसा असेल?


आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लसमध्ये 6.12 इंच आणि 6.69 इंचाचा डिस्प्ले, 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळू शकतो, ज्यामध्ये LTPS तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, हा  iphone 15 मॉडेल्ससारखा असू शकतो. यावेळी प्रो मॉडेल्समध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. iphone 16 Pro मध्ये 6.27 इंचाचा LTPO डिस्प्ले मिळू शकतो. तर iphone 16 Prp max (अल्ट्रा) मध्ये 6.86 इंचाची LTPO स्क्रीन मिळू शकते. iphone 15 Pro मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन आहे, तर iphone 15 Pro max मध्ये 6.7 इंचाचा पॅनेल मिळू शकतो. पण iphone 16 Prp Max ची स्क्रीन यापेक्षा थोडी मोठी असू शकते, अशी चर्चा आहे.  यावेळी आयफोन 16 प्रो मॉडेलमध्ये  Stacked Battery तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच या वेळच्या मॉडेल्सच्या बॅटरी लाईफ चांगली राहू शकते. स्टॅक्ड बॅटरी इलेक्ट्रिक वाहने आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये वापरली जाऊ शकते. 


मला Capture Button असण्याची शक्यता...


Apple सध्या iphone 16 वर काम करत आहे. नवीन iphone 16 सीरिजमध्ये Capture Button जोडले जाऊ शकते. पॉवर बटणाजवळ हे बटण जोडले जाईल. मात्र, त्याचा उपयोग काय आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. कॅप्चर बटण या नावावरुन आणि पोझिशनवरून फोटो क्लिक करण्यासाठी कामी येण्याची शक्यता आहे. कॅप्चर बटन फिजिकल शटर बटणाप्रमाणे काम करेल, ज्यामुळे आयफोन 16 चा कॅमेरा नियंत्रित करता येईल. हा कॅमेरा शॉर्टकट म्हणूनही काम करू शकतो. 


आयफोन 16 मध्ये काय आहे खास?


टेक्नोलॉजी अॅनालिस्ट Jeff Puयांनी एका रिसर्च नोटमध्ये म्हटले आहे की, आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो... Snapdragon X75 मॉडेम दोन्ही फोनमध्ये उपलब्ध असेल. MacRumorsच्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोन्समध्ये वेगवान आणि पॉवर एफिशिएंट 5G अॅडव्हान्स नेटवर्क आहे.


इतर महत्वाची बातमी-


Smartwatch Features : Smartwatch खरेदी करताय? जरा थांबा, या 5 गोष्टी आधी चेक करा, नाहीतर सगळे पैसे पाण्यात गेले म्हणून समजा!