Chandrayaan 4 : चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-4 (Chandrayaan 4) मोहिमेकडे लागलं आहे. भारताने चांद्रयान-3 मोहिमेद्वारे इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South pole) पोहोचणारा भारत (India) पहिला देश ठरला. यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमांचं (ISRO Space Mission) महत्त्व वाढलं आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोच्या कार्याचं जगभरात कौतुक होत आहे. आता भारतीय अंतराळ संस्था चांद्रयान-4 मोहिमेच्या तयारीत आहे. चांद्रयान 4 मोहिम ही भारत आणि जपानची संयुक्त अंतराळ मोहिम असणार आहे.


चांद्रयान 4 मोहिमेची जोरदार तयारी


चांद्रयान 4 ही भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिम आहे. या मोहिमेमध्ये चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. चांद्रयान-4 मोहिम भारत आणि जपानचं संयुक्त मिशन असणार आहे. इस्रो (ISRO) म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (Japan Aerospace Exploration Agency) या दोन्ही संस्था मिळून या मोहिमेची तयारी करत आहेत.


लुपेक्स मोहिम (Lupex Mission)


चांद्रयान-4 (Chandrayaan-4) ही मोहिम चांद्रयान-3 मोहिमेचा (Chandrayaan-3 on Moon) पुढील टप्पा असणार आहे. या मोहिमेकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. चांद्रयान 3 च्या यशामुळे या मोहिमेकडूनही अनेक अपेक्षा आहेत. ही चंद्र मोहिम भारत (India) आणि जपान (Japan) यांच्यातील संयुक्त अंतराळ मोहिम असून चांद्रयान-4 मोहिमेचं नाव लुपेक्स मोहिम (Lupex Mission) असं ठेवण्यात आलं आहे. ही मोहिम चांद्रयान-4 या नावानेही ओळखली जाईल. चांद्रयान-3 ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-4 मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधणार आहे, त्याशिवाय चंद्रावरील नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणण्याचाही प्रयत्न असेल.


इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहिम चंद्र


चांद्रयान-4 (Chandrayaan-4) ही मोहिम चांद्रयान-3 मोहिमेचा (Chandrayaan-3 on Moon) पुढील टप्पा असणार आहे. या मोहिमेकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. चांद्रयान 3 च्या यशामुळे या मोहिमेकडूनही अनेक अपेक्षा आहेत. ही चंद्र मोहिम भारत (India) आणि जपान (Japan) यांच्यातील संयुक्त अंतराळ मोहिम असून चांद्रयान-4 मोहिमेचं नाव लुपेक्स मोहिम (Lupex Mission) असं ठेवण्यात आलं आहे. ही मोहिम चांद्रयान-4 या नावानेही ओळखली जाईल. चांद्रयान-3 ने पाठवलेल्या माहितीच्या आधारे चांद्रयान-4 मोहिमेद्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्यात येतील.


ISRO आणि JAXA चं संयुक्त मिशन


चांद्रयान-4 मधील लँडर मॉड्युल ISRO बनवेल आणि जपानची स्पेस एजन्सी JAXA रोव्हर मॉड्यूल बनवणार आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ समनीत ठाकूर यांनी NIT हमीरपूरच्या वार्षिक टेक फेस्ट निंबस इव्हेंटमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. दोन आंतरराष्ट्रीय एजन्सी एकत्र काम करत असताना खूप काही शिकायला मिळते. अवकाश विज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या जीवनात खूप फायदेशीर. इस्रोच्या ग्रह मोहिमांमध्ये आव्हाने आणि यश दोन्ही आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 


इस्रोकडून अपयशाचं रुपांतर यशात


चांद्रयान-2 मध्ये इस्रोला अपयश मिळालं होतं. चांद्रयान-2 मधील लँडर विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर संपर्क तुटण्याची कारणे काय आहेत, हे शोधण्यासाठी इस्रोने एक योजना तयार कली होती. चंद्र मोहिमेत कोणत्या उणिवा होत्या आणि कुठे अधिक काम करण्याची गरज आहे, याबाबत अभ्यास करण्यात आला. काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर लँडिंग मॉड्यूल पुन्हा डिझाइन करण्यात आलं. यानंतर इस्रोनं चांद्रयान 2 च्या अपयशाचं यशात रूपांतर चांद्रयान 3 च्या यशात केलं. चांद्रयान 3 च्या यशानंतर आता आंतरराष्ट्रीय स्पेस एजन्सींनीही इस्रोमध्ये रस दाखवायला सुरुवात केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Chandrayaan-3 : आता इस्रोच्या चांद्रयान-4 चा ध्यास! चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी मोहिम