मुंबई : सध्या आयपीएलची (IPL) सगळीकडे धूम आहे. एकीकडे हे सामने चालू असताना दुसरीकडे ड्रीम 11, माय 11 सर्कल यासारख्या अॅप्सवर काही लोक पैसे लावतात. सामना चालू असताना पैसे कमवण्याची संधी या अॅप्सच्या माध्यमातून मिळते. असे असतानाच फक्त ऑनलाईन गेम्स खेळून लाखो रुपये कमवण्याचं प्रलोभन एका अॅपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. समाजमाध्यावर या अॅपचे प्रोमशन करणारे वेगवेगळे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पण या अॅपवर फक्त विमान उडवण्याचा गेम खेळून कोट्यधीश होता येईल का? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. 


नेमके अॅप काय आहे? 


मिळालेल्या माहितीनुसार सध्या गुगल स्टोअरवर एव्हिएटर (Aviator) नावाचे एक गेमिंग अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून विमान उडवण्याचा गेम खेळून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता, असा दावा या गेमच्या कंपनीकडून केला जातोय. आतापर्यंत या अॅपला (Aviator Gaming App) तीन लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. मात्र या अॅपबद्दल अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे या अॅपद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. 


डीपफेक व्हिडीओंच्या माध्यमातून प्रमोशन 


या अॅपचे डीपफेक व्हिडीओंच्या माध्यमातून प्रमोशन करण्यात आले होते. साधारण दीड ते दोन महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू विराट कोहली यांचा चेहरा दाखवून काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आले होते. या व्हिडीओत वरील व्यक्ती या एव्हिओटर अॅपचे प्रमोशन करताना दिसत होते. या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात शेअरही केले जात होते. 


अक्षय कुमार, तेंडुलकर, कोहली यांचे डीपफेक व्हिडीओ


मात्र खरं पाहता हे व्हिडीओ डीपफेक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केले होते. अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशा कोणत्याही सेलिब्रिटीने या अॅपची जाहिरात केलेली नव्हती. हा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अक्षय कुमार यांने नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आमच्या चेहऱ्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणीही अक्षय कुमारने केली होती.  


प्रलोभनांना बळी न पडण्याचा सल्ला


मात्र, या अॅपच्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे, असा दावा या अॅपचे वापरकर्ते म्हणत आहेत. तशा प्रतिक्रियाच लोकांनी गुगल स्टोअरवर दिल्या आहेत. हे अॅप एक स्कॅम आहे, मी पैसे गुंतवले होते. पण मला ते परत घेता येत नाहीयेत, असे एका युजरने म्हटले होते. त्यामुळे अशा प्रकारचे अॅप डाऊनलोड करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. तसेच प्रलोभनांना बळी न पडता शहानिशा करूनच योग्य निर्णय घ्यावा असे सांगितले जातेय.


हेही वाचा :


सोन्याचा दर कमी होईना! 'या' कारणामुळे लवकरच होणार 1 लाख रुपये तोळा!


इस्रायल-इराण युद्धाच्या स्फोटात भारतीय शेअर बाजार होरपळला, कंपन्यांच्या भांडवलात तब्बल 4.98 लाख कोटींची घट!


तयारीला लागा! या आठवड्यात येणार 'हे' दोन जबरदस्त IPO, मालामाल होण्याची नामी संधी!