Whats App News: ट्विटरमध्ये (Twitter) काम करणार्‍या एका इंजिनिअरनं स्वतःच्या मोबाईलवरुन घेतलेला एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला होता. अॅप अॅक्टिव्ह नसतानाही  WhatsApp कथितपणे डिव्‍हाइसचे मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मागत असल्याचं दिसून आलं. इंजिनिअरनं शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्टनंतर एकच खळबळ माजली. इंजिनिअर फोड डबिरी यांनी स्क्रिनशॉर्ट शेअर करत दावा केला की, जेव्हा ते झोपले होते त्यावेळी त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन अॅक्टिव्ह नसतानाही मायक्रोफोनचा उपयोग करत होतं. 


ट्विटर इंजिनिअरनं केलेल्या दाव्यानंतर व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवता येणार नाही, असं ट्वीट एलॉन मस्क (Elon Musk) यांनी केलं आहे. कारण इंजिनिअर झोपेत असताना व्हॉट्सअॅप बॅकग्राउंडमध्ये मायक्रोफोनचा वापर करत होतं. ट्विटर कर्मचाऱ्यानं Android डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला आहे. ट्वीटला उत्तर देताना मस्कनं लिहिलं की, व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवता येणार नाही. तसेच, दुसरीकडे मस्क यांनी ट्विटर बॉस व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसह ट्विटरवर व्हॉट्सअॅप सारखे फिचर्स आणत असल्याचं जाहीर केलं.






ट्विटरचे इंजिनिअर फोड डबिरी यांचं म्हणणं आहे की, व्हॉट्सअॅप मायक्रोफोनचा वापर करत आहे. त्यांनी यासाठी Android डॅशबोर्डचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. स्क्रिनशॉर्टवरुन असं दिसतंय की, व्हॉट्सअॅप पहाटे 4.20 वाजल्यापासून ते सकाळी 6.53 वाजेपर्यंत बँकग्राउंडमध्ये त्यांच्या मायक्रोफोनचा एक्सेस करत होतं. 


डाबिरी यांच्याकडे गुगलचा पिक्सल 7 प्रो हा स्मार्टफोन आहे. यावर थर्ड पार्टी अ‍ॅप्स नसतात, क्लिन युआयचा अनुभव मिळतो. ते रात्री झोपले असतानाही WhatsApp त्यांच्या फोनचा मायक्रोफोन वापरत होता. महत्वाचे म्हणजे, डाबिरी हे ट्विटरचे इंजिनिअर आहेत. आता या प्रकरणावर व्हॉट्सअॅपने प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकार एखाद्या बगमुळे झाला असावा. आम्ही यासंदर्भात माहिती घेत आहोत, असं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.


Whatsappचं स्पष्टीकरण 


Whatsapp नं एका ट्वीटमध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. Android मधील एका बगमुळे ही समस्या उद्भवते जी त्यांच्या प्रायव्हसी डॅशबोर्डमध्ये चुकीची माहिती देते. युजर्सकडे असलेला फोन गुगल पिक्सेल होता आणि व्हॉट्सअॅपचं म्हणणं आहे की, त्यांनी गुगलला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे. दुसर्‍या ट्वीटमध्ये, व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे की, त्यांच्या युजर्सचे मायक्रोफोन सेटिंग्जवर 'पूर्ण नियंत्रण' आहे आणि जेव्हा युजर्स कॉल करत असेल, व्हॉइस नोट किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करत असतील तेव्हाच माइक अॅक्टिव्ह होऊ शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


तुमच्या WhatsApp वरही +84, +62, +60 या नंबर्सवरुन कॉल्स येतायत? वेळीच सावध व्हा, अन्यथा मोठा गंडा घातला जाईल