Verification on X : इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून, प्लॅटफॉर्ममध्ये सतत बदल होत आहेत. इलॉन मस्कने ट्विटरचे स्वरूप बदलले आहे. यूजर्सकरता इलॉन मस्क कायमच नवनवीन अपडेट करत असतात. आता पुन्हा एकदा इलॉन मस्क ट्विटरमध्ये मोठा बदल करणार आहेत. एक्स वर व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया करणे गरजेचं आहे. यासाठी ट्विटरचं सबस्क्रिप्शन देखील घ्यावं लागतं. सुरूवातीस ही प्रक्रिया खूप अवघड होती. मात्र आता ती अगदी सोपी करण्यात आली आहे. 


अशा पद्धतीने होणार व्हेरिफिकेशन


आता ट्विटरवर व्हेरिफिकेशन करणं अधिक सोप होणार आहे. याकरता तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट हे डाॅक्युमेंट्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. खरे तर ट्विटरने याबाबत  कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र रिसर्चर निमा ओवजी यांनी याबाबत पोस्ट केली आहे. निमा ओवजी एक स्वतंत्र अॅप संशोधक आणि ब्लॉगर आहे. जो ट्विटरच्या आगामी अपडेट्स आणि फिचर्सवर लक्ष ठेवतो. त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.  ज्यामध्ये कंपनीच्या नवीन अपडेटची माहिती उपलब्ध आहे. त्याने एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.






 निमा ओवजी याने शेअर केलेल्या माहितीप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला अकाउंट व्हेरिफाईड करता येणार आहे. यासाठी फक्त तुम्हाला सर्वात आधी तुमच्या आयडीचा फोटो अपलोड करावा लागेल, आणि मग त्या आयडीसोबत एक लाईव्ह सेल्फी घ्यावा लागेल. यानंतर पेमेंट केल्यानंतर लगेच तुमचं अकाउंट व्हेरिफाईड होईल. अशा प्रकारे झाल्यावर एक्स प्लॅटफॉर्मवरील बॉट्स आणि स्पॅम अकाउंट्सची संख्या कमी होणार आहे.


तर याच पद्धतीने काही दिवसांपूर्वी असेच एक नवीन अपडेट  इलॉन मस्कने ट्विटरवर लागू केले होते. ब्लॉक हा पर्याय एक फीचर म्हणून हटवण्यात येणार आहे. केवळ डीएम (डायरेक्ट मेसेज) मध्ये ब्लॉकचा ऑप्शन उपलब्ध असेल, असं मस्कने स्पष्ट केलं होतं. मात्र यूजर्सकरता ब्लाॅक ऐवजी म्यूट हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला ब्लाॅक करता त्यावेळी तुम्हाला त्या व्यक्तीची एकही पोस्ट दिसत नाही किंवा संबंधित व्यक्ती तुम्हाला मेसेज पाठवू शकत नाही. मात्र, जेव्हा तुम्ही एखाद्या यूजरला म्यूट करता, तेव्हा त्या व्यक्तीने केलेल्या पोस्ट तुमच्या फीडमध्ये दिसणं बंद होतं. सोबतच, त्या व्यक्तीलाही तुमच्या पोस्ट आपल्या फीडमध्ये दिसत नाहीत. अर्थात, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर जाऊन त्याच्या पोस्ट पाहू शकता. यावर अनेक यूजर्सने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.