Is My Phone Listening to Me : आजकाल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात  पुढे गेले आहे. लोक याच तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक चांगल्या गोष्टी करतात. पण असे काही लोक आहेत जे याच तंत्रज्ञानाचा वापर गैर पद्धतीने करत आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात चुकीच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना सर्रास फसवले जात आहे. अशा परिस्थितीत लोकांचे लाखोंचे नुकसान कित्येकदा होते. 


आजच्या जगात आपल्या खाजगी गोष्टी (Privacy) खाजगी राहतीलच असं नाही. कित्येक अ‍ॅप्स (Apps) आणि हॅकर्स (Hackers) विविध पद्धतीने तुमचा डेटा (Data) आणि गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या स्मार्टफोनच्या (Smartphones) मदतीने तुमची माहिती चोरू शकतो. या डिजीटल युगात कोठेही बसून काहीही करता येते. कित्येक लोकांना हे माहिती देखील नसते की, तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गप्पा रेकॉर्ड (Record) करण्याचं कामही काही अ‍ॅप्स अगदी सहजपणे करू शकतात.


आपणच देतो Apps ना परवानगी (We Give Permission to Apps)


आपण नवीन अॅप फोनमध्ये डाऊनलोड करतो आणि ते अॅप सुरू करण्याकरता आपल्याला कित्येकदा मायक्रोफोन (Microphone) चालू करण्याकरता परवानगी मागितली जाते. आपण जेव्हा मायक्रोफोन अ‍ॅक्सेस (Access) देतो, त्यावेळी आपण आपले फोन काॅल रेकॉर्ड करण्याची देखील परवानगी देत असतो.


'या' पद्धतीने ठेवा सुरक्षित डेटा (Keep Your Phone Safe This Way)


अशा प्रकारची हेरगिरी टाळण्यासाठी एखादं अ‍ॅप वापरत नसताना त्याचा मायक्रोफोन अ‍ॅक्सेस काढून घेणंच योग्य ठरतं. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंग्समध्ये (Settings) जावं लागेल. त्यानंतर अ‍ॅप मॅनेजमेंटमध्ये जाऊन तुम्हाला ज्या अ‍ॅपला मायक्रोफोन अ‍ॅक्सेस (Microphone Access) द्यायाचा नाही ते सिलेक्ट करा. यानंतर अ‍ॅप परमिशन हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्हाला दिसेल, की त्या अ‍ॅपला कोणकोणत्या प्रकारच्या परमिशन तुम्ही दिल्या आहेत. यामध्ये साधारणपणे फाईल अ‍ॅक्सेस (File Access), कॅमेरा अ‍ॅक्सेस (Camera Access), मायक्रोफोन अ‍ॅक्सेस, कॉलिंग अ‍ॅक्सेस (Calling Access), कॉन्टॅक्ट्स अ‍ॅक्सेस (Contact Access) अशा परवानग्यांचा समावेश असतो. यातील मायक्रोफोन अ‍ॅक्सेस ही परवानगी काढून घेतल्यास ते अ‍ॅप तुमचं बोलणं रेकॉर्ड करू शकत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Aadhaar update :आधार अपडेट करण्याच्या बहाण्याने सुरू आहे फिशिंग, आधार अपडेट करणाऱ्यांना केंद्राचा सावधनतेचा इशारा!