Apple Event 2023 Live Streaming : आयफोन यूजर्सकरता मोठी खूशखबर आहे. ज्या Iphone 15 ची अनेक लोक वाट पाहत होते. Iphone 15 सीरिज उद्या लाँच होणार आहे. खरे तर उद्या कंपनीचा 'Wanderlust' इव्हेंट आहे. ज्यामध्ये कंपनी iPhone 15 सीरीज व्यतिरिक्त इतर गॅजेट्स लॉन्च करेल. हा Event क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा Event सुरू होईल. तुम्ही घरबसल्या हा Event पाहू शकता. तुम्ही कंपनीचे यूट्यूब चॅनल, अधिकृत वेबसाइट आणि Apple TV द्वारे लाँच इव्हेंट पाहू शकाल. कंपनी आपल्या वेबसाइटवर इव्हेंट लाईव्ह स्ट्रिम करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारपासून iPhone 15 सीरीजसाठी प्री-ऑर्डर सुरू होतील.
आयफोन व्यतिरिक्त 'हे' गॅजेट्स होणार लाँच
Iphone 15 ची अनेकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. याच Iphone 15 सीरिजच्या अंतर्गत आणखीन 4 आयफोन लाँच केले जाणार आहेत. ज्यात iPhone 15, 15 Plus, 15 Pro आणि 15 Pro Max यांचा समावेश असेल. सोबतच कंपनी स्मार्टवॉच सीरीज 9 आणि अल्ट्रा 2 वॉच देखील लाँच करेल. सोबतच एअरपाॅड्स आणि नवीन ओएसची माहितीही देईल. कंपनी iOS 17, iPadOS 17 आणि watchOS 10 वर अपडेट देऊ शकते. 15 Pro आणि 15 Pro Max ब्लॅक, सिल्व्हर, ब्लू आणि टायटॅनियम कलरमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.
iPhone 15 ची संभाव्य वैशिष्ट्ये
iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते. भारतात iPhone 15 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असेल. ही सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत असू शकते. त्याचवेळी, काही लीक्समध्ये असेही बोलले जात आहे की कंपनी Apple iPhone 15 ची किंमत वाढू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
- Apple Smartawatch : Apple Watch Series 9 आणि Ultra 2 मध्ये मिळणार भन्नाट फिचर्स , जाणून घ्या सविस्तर