Iphone 13 Offer : अ‍ॅपलचा नवीन आयफोन हा काही दिवसांमध्येच लाँच होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये इतर काही उत्पादनांसोबत iPhone 15 सीरीज देखील लाँच होणार आहे. यामुळे आयफोनच्या जुन्या मॉडेल्सची किंमत कमी झाली आहे.


अ‍ॅपलचा नवीन आयफोन लाँच झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सची किंमत कमी होण्याचा प्रकार दरवर्षीच दिसून येतो. सध्या iPhone 13 या मॉडेलची किंमत कमी झाली आहे. iPhone 13 फ्लिपकार्ट आणि अॅमेझाॅनवर 58,999 रूपयात मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवर हा फोन घेतल्यास 2000 रुपयांचा HDFC बँक कार्ड डिस्काउंटही मिळत आहे. आयफोन 13 ची किंमत 69,990 रुपये आहे. पण अॅपलची नवी सीरिज काही दिवसांनी लाँच होणार असल्याने कंपनी जुन्या मॉडेलवर सूट देत आहे.


IPhone 13 फिचर्स


फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. यामध्ये एक कॅमेरा 12MP Wide आणि दुसरा  12MP Ultra Wide आहे. फोनमध्ये 12MP चा TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे. ज्यामध्ये Night mode आणि 4K Dolby Vision HDR व्हिडीओ फिचर आहे. या फोनचा स्क्रिन साइज 6.1 इंच आहे. तसेच Super Retina XDR चा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 256GB RAM देखील आहे. हा स्मार्टफोन A15 बायोनिक चिपवर काम करतो. या 5G फोनमध्ये 13 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. यासोबतच फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप आणि 12MP चे दोन सेन्सर देण्यात आले आहेत. यामध्ये फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. ड्युअल सिम सेवेसह या फोनमध्ये एक वर्षाची वॉरंटीही मिळणार आहे.


iPhone 15 ची संभाव्य वैशिष्ट्ये अशी असतील


iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.


कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते.


 


इतर महत्वाची बातमी


WhatsApp New Feature : आता व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं होणार सोपं, जाणून घ्या स्टेप्स