Artificial Intelligence : सर्वसाधारपणे आपण पाहतो की आजारपणाचे निमित्त करून कर्मचारी कामावरून सुटी घेतात. कर्मचाऱ्यांना सुटी घ्यायची असेल तर नियमानुसार एक-दोन दिवसाची सुटी मिळते. पण हीच सुटी तीन-चार दिवसापेक्षा जास्त घेतली असेल तर मग समस्या निर्माण होते. सर्वसाधारपणे कर्मचारी आजारपणाची अनेक कारणे सांगतात. हा आरोग्याशी संबंधित प्रश्न असल्याने कंपनीच्या व्यवस्थापकाकडून सुटीसाठी नाही बोलू शकत नाहीत. पण यातील सुटीची बहुतांश कारणे खोटी असतात. हे कारण खरे आहे की खोटे आहे, याचे योग्य व्हेरिफिकेशन करण्यासाठी अद्याप तरी कोणतीही यंत्रणा नव्हती. पण अनेक काळापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमतेची जोरदार चर्चा होत आहे. या प्लॅटफॉर्मवरून  कंपन्यांनी आपले अनेक प्रकारची उत्पादने बनवायला सुरूवातही केली आहे. याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सुटीचे हे कारण खरे आहे की खोटे आहे, याचे योग्य व्हेरिफिकेशन  करण्यासाठी ओपन एआयवर चॅटजीपीटीच्या (ChatGpt) समांतर चॅटबॉटच्या  (Chatbot) निर्मितीवर काम करत असल्याचे समोर आले आहे.


या आधीपासूनच अनेक कंपन्यांनी त्यांच्या ऊत्पादने आणि सेवांमध्ये चॅटजीपीटीसारख्याच (ChatGpt) चॅटबॉटचा (Chatbot) वापर करायला सुरूवात केली होती. यामुळे तुम्ही एखाद्या कंपनीचे कर्मचारी आहात आणि आजारपणाचे निमित्त करून कामावरून सुटी घेत असाल तर तुमची काही खैर नाही.  कारण तुमच्या आवाजारून तुम्ही आजारी आहात की नाही? हे सत्य पडताळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने एक चॅटबॉट तयार केले आहे. 


अलीकडेच सुरतच्या सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी एक अभ्यास केला आहे. या अभ्यासासाठी 630  लोकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये लोकांच्या आवाजाच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यात आला. यातील 630 लोकांपैकी 111 लोकांमध्ये सर्दी-तापाची लक्षणे असल्याचे समजले. यासाठी आवाजाचे सॅम्पल टेस्ट घेण्यात आले होते. याचा नीट अभ्यास करण्यास आला. जेणेकरून सर्दी-तापाच्या लक्षणांचे नेमके कारण (detecting cold through voice) कळू शकेल. या अभ्यासात आवाजातील रिदमचा वापर करण्यात आला. यात व्यक्तीच्या आवाजातील गतीचे  निरिक्षण करण्यात आले. यानुसार, जेव्हा व्यक्ती सर्दी-तापाने आजारी पडून फणफणत असते. त्याच्या शरिराचा वेग नेहमीपेक्षा असाधारण असतो. त्यामुळे आवाजाचा पूर्ण रिदम बदलेला दिसून येईल.


थोडक्यात, नेहमीपेक्षा आवाजातील संतुलन बिघडलेले असते. यावर संशोधकांनी विश्वास ठेवून एआय (artificial intelligence) मशिन लर्निंगच्या साहाय्याने लोकांच्या सर्दी-तापाच्या लक्षणांची सॅम्पल टेस्ट केली आणि लोकांना खरच सर्दी-ताप झाला आहे का याचे सत्य पडताळण्यासाठी एक प्रयोग केला आहे.  त्यामुळे आता कर्मचारी सर्दी-तापाचे खोटे कारण देऊन सुटी घेत असतील तर या मशिनकडून तुमची चोरी पकडली जाऊ शकते. त्यामुळे खोट बोलणाऱ्यांना पकडून हे मशिन एक प्रकारे पोलिसांसारखेच काम करणार आहे. समजा, आपल्या घरातील किंवा शाळेतील एखादे मुल खोटं बोलत आहे की खरे हे आई-बाबा किंवा त्यांचे शिक्षक चटकन ओळखून आणि मुलाची लबाडी पकडतात. अगदी, यासारखेच हे आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे मशिन आई-बाबा, शिक्षक आणि वरती उल्लेख केल्याप्रमाणे पोलिसांची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे हे एआयच्या या नविन चॅटबॉटबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.


दरम्यान, या प्रयोगात लोकांच्या सर्दी-तापाची नेमकी लक्षणे समजण्यासाठी त्यांच्याकडून काही कृती करवून घेण्यात आली. यातील सहभागी लोकांना काही गोष्टी ऐकण्यासाठी सांगण्यात आले होते. या प्रयोगात सहभागी 630 लोकांना एकपासून ते चाळीसपर्यंतची अंक मोजण्यासाठी सांगण्यात आले. यानंतर आठवड्याच्या शेवटी त्याबद्दल मनसोक्त बोलण्यासाठी सांगण्यात आले. या अभ्यासामागील उद्देश्य एक होता की, लोकांना खरंच सर्दी-तापाची लक्षणे आहेत का? याचा शोध कोणत्याही डॉक्टरांची मदत न घेता एआय (AI) मशिन लर्निंगच्या मदतीने घेणे. या अभ्यासाची 70 टक्के अचूकता दिसून आल्याचे अभ्याकांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या कंपन्यांत आणि प्रोफेशनल पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांमध्ये या एआय मशिनचा मोठ्या प्रमाणात वापर वाढण्याची शक्यता आहे. ही एआय मशिन उद्योजक व व्यावसायिक यांना सर्वाधिक पसंत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  कारण यामुळे सर्दी-तापाचे  निमित्त देऊन कामारून सुट्टी घेणाऱ्याना कर्माचाऱ्यांवर काही प्रमाणात बंधने आणण्यासाठी मदत होणार आहे.