OnePlus Nord CE 3 Lite Updates: मागील आठवड्यात  वन प्लस कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन वन प्लस नॉर्ड CE 3 लाइट लाँच केला होता. फोन लाँचिंगनंतर अनेकजण खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले. ग्राहकदेखील फोनच्या सेलची प्रतीक्षा करत होते. अखेर आजपासून, 11 एप्रिल 2023 पासून दुपारी 12 वाजल्यापासून फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 20 हजार रुपयांच्या बजेट फोनमध्ये लाँच झालेला हा आकर्षक स्मार्टफोन आहे. One Plus Nord CE3  लाइटचे काही खास ऑफर्स आणि डील्स जाणून घ्या...


One Plus Nord CE3 लाइटवर ऑफर्स


One Plus Nord CE3 स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा मोबाईल फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 256 जीबी स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. 


ICICI बँक कार्ड पेमेंट आणि क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI वर 1,000 रुपयांचा डिस्काउंट आहे. हा मोबाईल फोन OnePlus.in, Amazon.in, OnePlus स्टोअर्स आणि रिटेल पार्टनर स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. OnePlus Nord CE 3 Lite खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,299 रुपये किंमतीचे OnePlus Nord Buds CE मोफत मिळणार आहेत. 


One Plus Nord CE3 खरेदी करणे फायदेशीर?


OnePlus Nord CE 2 Lite लाँच झाला तेव्हा अनेकांनी त्या फोनमधील कमतरतेवर बोट ठेवले होते. इतर फोनच्या तुलनेत फोनमध्ये चांगले हार्डवेअर चांगले नव्हते. या मोबाईलवर नकारात्मक मत बनवलं तरी OnePlus Nord CE 2 Lite हा 2022 मधील सर्वाधिक विकला जाणारा फोन होता. बरेच जण ब्रँडला अधिक महत्त्व देत असल्याने या मोबाईलला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आताही ब्रँड व्हॅल्यू जपणाऱ्यांकडून या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज आहे. 


OnePlus Nord CE 3 Lite ची फिचर्स


OnePlus Nord CE 3 Lite मध्ये 120Hz डिस्प्ले (LCD नाही AMOLED), 108-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट, दोन वर्षांची Android अपडेट्स आणि स्नॅपड्रॅगन 695 चिप आहे. 


पोकोचा नवीन स्मार्टफोन Poco C51 लॉन्च


 पोको (Poco) या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने दहा ते बारा हजार रुपयांच्या रेंजमधील फोन ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीने Poco C51 हा मोबाईल फोन लाँच केला आहे. यामध्ये युजर्सना 7GB चा रॅम मिळणार आहे. 


पोकोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध असून 120hz इतका रिफ्रेश रेटचा सपोर्ट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे स्पष्ट आणि चांगले फोटोज पाहायला मिळणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये युजर्सना 4GB रॅम उपलब्ध करुन देण्यात आली असून 7GB पर्यंत एक्स्पांडेबल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 MAh इतकी शक्तिशाली बॅटरी उपलब्ध असणार असून MediaTek Helio G36 प्रोसेसरसोबत फोन मिळणार आहे. सोबत 10 वॅटचा चार्जर असणार आहे. तसेच ज्यांना फोटेग्राफीची आवड किंवा छंद आहे, अशा फ्रेशर्स फोटोग्राफर्सना या बजेट फ्रेंडली मोबाईल फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा ड्यु्एल AI कॅमेरा उपलब्ध असणार आहे. यासोबत 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा मोबाईल फोन अँड्रॉईड 13 वर काम करतो.