AC Care Tips : देशात मान्सूनचे आगमन झाले असले तरी उत्तर भारतासह मोठ्या भागात अद्यापही उष्णतेच्या झळा बसत आहेत. अशा वेळी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण घरी एअर कन्डिशनर म्हणजे एसीचा वापर करतो. मात्र आता एसीमध्ये स्फोट होत असल्याच्या बातम्याही सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे एसीबाबतही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एसी फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की मेंटेनन्स वेळेवर न होणे, नीट साफसफाई न करणे, शॉर्ट सर्किट. पण एसीचा स्फोट होण्यापूर्वी त्याचे काही संकेत मिळत असतात. त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम स्फोटामध्ये होऊन आपले आर्थिक नुकसान होऊ शकतं.
एसीच्या आवाजात बदल
प्रचंड उष्णतेमुळे एसीचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. एसीमध्ये काही बिघाड असल्यास त्यातून आवाज येतो. बरेच लोक या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नाहीत आणि दुर्लक्ष करतात. पण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही मेकॅनिकला बोलावून एसी तपासावा. जेणेकरुन वेळेत दुरुस्ती करता येईल.
AC मधून कमी थंड हवा येते
अनेक वेळा असे दिसून आले आहे की एसी जास्त चालल्याने त्यातून थंड हवा कमी येते. यामागचे कारण फॅन खराब होणे किंवा वायरिंगमध्ये काही समस्या असू शकते. त्याचा प्रभाव कंप्रेसरवरही जाणवतो. त्यामुळे आगही लागू शकते. जर ते वेळीच दुरुस्त केले नाही तर ते तुमच्यासाठी धोकादायक बनू शकते.
एसीमध्ये दिलेले मोड नीट काम करत नाहीत
लोकांच्या सोयीसाठी एसीमध्ये अनेक मोड दिलेले असतात. त्यामध्ये फॅन मोड, कूल मोड, ड्राय मोड, एनर्जी सेव्हिंग मोड इत्यादींचा समावेश आहे. ते रिमोट कंट्रोलच्या मदतीने बदलता येऊ शकते. परंतु जर तुम्हाला मोड बदलण्यात अडचण येत असेल तर त्याची तपासणी करणे योग्य ठरेल. सेन्सरच्या खराबीमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
एसी बॉडी ओव्हरहिटिंग
जर तुमच्या एसीटी बॉडी पूर्वीपेक्षा जास्त गरम होत असेल तेव्हा समजून घ्या की तुमच्या एसीमध्ये काही समस्या आहे आणि ती मेकॅनिकला दाखवणे आवश्यक आहे. एसी बॉडी जास्त गरम होण्यामागे योग्य व्हेंटिलेशन नसणे हे देखील कारण आहे. त्यामुळे एसीमधून गरम हवा बाहेर येऊ शकत नाही. याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.
ही बातमी वाचा: