मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आलं आहे. तंत्रज्ञानामुळे तुमच्या फोनवर सर्व काही सहज उपलब्ध होतं. लोकही आजकाल थिएटरमध्ये जाण्याऐवजी मोबाईल फोनवर कंटेंट पाहण्याला जास्त पसंती देतात. बहुतेकांना वेब सिरीज बघायला आवडतात. अनेकांना तर जणू वेब सीरीजचं वेड लागलं आहे. यामुळे अनेक लोक वेब सीरीज बिंज वॉच करतात. बहुतेक वेब सीरीज फक्त OTT प्लॅटफॉर्मवर रिलीझ होतात. पण त्यासाठी तु्म्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागलं. त्याच्या किंमतीमुळे, बरेच लोक ओटीटी सबस्क्रिप्शन खरेदी करत नाहीत. पण आता तुम्हाला वेब सीरीज स्वस्तात पाहता येणार आहे.
ॲमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन स्वस्तात
ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरीज तुम्हाला स्वस्तात पाहता येणार आहेत. आता तुम्ही 70 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकाल. तुम्हालाही ॲमेझॉन प्राईमवर नुकतीच रिलीज झालेली पंचायत नवीन वेबसीरीज बघायची असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. यादल अधिक माहिती जाणून घ्या.
नवीन ॲमेझॉन प्राईम लाईट प्लॅन
ॲमेझॉन प्राईमने आपल्या यूजर्ससाठी लाइट सबस्क्रिप्शन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमुळे तुम्ही स्वस्तात ॲमेझॉन प्राईमचा (Amazon Prime) आनंद घेऊ शकता. ॲमेझॉन प्राईम लाईट (Amazon Prime Lite) सबस्क्रिप्शन किंमत 799 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला एका वर्षाची वैधता मिळते. याचं किमतीचं गणित केलं तर सबस्क्रिप्शनची मासिक किंमत सुमारे 70 रुपये आहे. या सबस्क्रिप्शनचा वापर करून, तुम्ही तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवर म्हणजे मोबाईल, टॅबलेट किंवा टीव्हीवर तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता.
ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शनचे फायदे
ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका दिवसाच्या ॲमेझॉन डिलिव्हरीपासून शेड्यूल डिलिव्हरीपर्यंत अनेक पर्याय मिळतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा कंटेट एचडी क्वालिटीमध्ये पाहता येईल. याशिवाय तुम्हाला या सबस्क्रिप्शनमध्ये प्राइम म्युझिकचा ॲक्सेसही मिळेल. पण यामध्ये काही जाहिराती दिसतील, ज्यामुळे युजर्सचा अनुभव थोडासा खराब होण्याची शक्यता आहे.
ॲमेझॉन प्राईम नियमित सबस्क्रिप्शन
तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवर जाहिरातींशिवाय कंटेट पाहायचा असेल तर तुम्ही चुकूनही ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शन खरेदी करू नका. जाहिरातींशिवाय कंटेट पाहण्यासाठी फक्त नियमित सबस्क्रिप्शन खरेदी करा. Amazon Prime च्या वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत 1499 रुपये आहे. तुम्हाला ॲमेझॉन प्राईमचा तीन महिन्यांचा प्लान घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी 599 रुपये मोजावे लागतील. Amazon Prime मासिक सबस्क्रिप्शनची किंमत 299 रुपये आहे. या सबस्क्रिप्शनचा वापर करून, तुम्ही अनेक डिव्हाईसेसवर लॉग इन करुन कंटेट पाहू शकता आणि कोणताही प्रोग्राम डाउनलोड करू शकता.