एक्स्प्लोर
VIDEO : झिवा धोनीच्या आवाजात पुन्हा मल्ल्याळम गाणं!
zivasinghdhoni006 या इन्स्टा अकाऊण्टवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये झिवा मल्याळम भाषेतलं गाणं गाताना पाहायला मिळत आहे.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची मुलगी झिवा सोशल मीडियावर स्टार झाली आहे. तिच्या व्हिडिओ आणि फोटोजना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. झिवाचा नवा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला असून त्यात ती पुन्हा मल्याळम गाणं गाताना दिसत आहे.
zivasinghdhoni006 या इन्स्टा अकाऊण्टवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये झिवा मल्याळम भाषेतलं गाणं गाताना पाहायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वीही झिवाने एक मल्याळम गाणं गायल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याचं कौतुक झाल्यानंतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
'कानिकुनम नेरम कमलनेत्रांते' हे 1964 मधल्या ओमानकुट्टन या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं झिवाने गायलं आहे. या व्हिडिओला जवळपास अडीच लाख व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वीही तिने अद्वैतम चित्रपटातील गाणं गायलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement