ODI World Cup 2023 Records : सध्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 11 सामने झाले आहेत. आतापर्यंत विश्वचषक फलंदाजांसाठी अतिशय उत्तम ठरत आहे पण गोलंदाजांची काहीशी निराशा झाली आहे. याचं कारण म्हणजे आतापर्यंत फलंदाजांनी सर्वाधिक विक्रम रचले आहेत. 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अनेक नवे विक्रम रचले गेले. पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा 345 धावांचं आव्हन पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानने विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा विजय नोंदवला. यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. भारताने सलग सात वेळा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. या सामन्यात एकूण चार शतके झळकावली गेली. ही विश्वचषकातील एका सामन्यातील सर्वाधिक शतकं आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत अनेक मोठे विक्रमही केले आहेत. जाणून घेऊया विश्वचषकात आतापर्यंत केलेले खास विक्रम.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक
- 49 चेंडू- एडन मार्कराम विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023*
- 50 चेंडू- केविन ओब्रायन विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू, 2011
- 51 चेंडू- ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका, सिडनी, 2015
- 52 चेंडू- एबी डिव्हिलियर्स विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी 2015
आयसीसी वनडे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज
- 2785 धावा - विराट कोहली (64 डाव)
- 2719 धावा- सचिन तेंडुलकर (58 डाव)
- 2422 धावा - रोहित शर्मा (64 डाव)
- 1707 धावा - युवराज सिंग (62 डाव)
- 1671 धावा - सौरव गांगुली (32 डाव)
विश्वचषकातील सर्वात जलद 1000 धावा
- 19 डाव- डेव्हिड वॉर्नर/रोहित शर्मा
- 20 डाव - सचिन तेंडुलकर/ एबी डिव्हिलियर्स
- 21 डाव - विव्ह रिचर्ड्स/सौरव गांगुली
- 22 डाव - मार्क वॉ/हर्शेल गिब्स
वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी चेंडूत 50 विकेट्स
- 941 चेंडू - मिचेल स्टार्क
- 1187 चेंडू - लसिथ मलिंगा
- 1540 चेंडू - ग्लेन मॅकग्रा
- 1562 चेंडू - मुथय्या मुरलीधरन
- 1748 चेंडू - वसीम अक्रम.
वनडेतील सर्वात कमी डावात 6 शतके
- डेव्हिड मलान - 23 डाव
- इमाम-उल-हक - 27 डाव
- उपुल थरंगा - 29 डाव
- बाबर आझम - 32 डाव
- हाशिम आमला - 34 डाव.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा पाठलाग
- 345 धावा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, हैदराबाद, 2023*
- 328 धावा आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू, 2011
- 322 धावा बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, टॉंटन, 2019
- 319 धावा बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, नेल्सन, 2015
- 313 धावा श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे, न्यू प्लायमाउथ, 1992.
एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग विजय
- 8 वेळा - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
- 7 वेळा - भारत विरुद्ध पाकिस्तान
- 6 वेळा - वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या
- 428/5 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली 2023*
- 417/6 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 2015
- 413/5 - भारत विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन 2007
- 411/4 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड, कॅनबेरा 2015
- 408/5 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी, 2015.
एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सर्वाधिक धावा (दोन्ही डाव मिळून)
- 754 धावा - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली 2023*
- 714 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, नॉटिंगहॅम 2019
- 688 धावा - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, सिडनी 2015
- 682 धावा - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, नॉटिंगहॅम 2019
- 676 धावा - भारत विरुद्ध इंग्लंड, बेंगळुरू 2011.
विश्वचषक सामन्यात सर्वाधिक चौकार
- 105 चौकार- दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, दिल्ली, 2023
- 93 चौकार - वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, 2015
- 89 चौकार - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बॅसेटेरे, 2007
- 84 चौकार - श्रीलंका विरुद्ध केनिया, कँडी, 1996.