India vs Pakistan : थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर (Narendra Modi Stadium) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आमना सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता या महामुकाबल्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे (Team India) पारडे जड मानले जात आहे. पण टीम इंडियाला पाकिस्तानच्या (IND vs PAk) एका धाकड फलंदाजापासून सावध रहायला हवे. होय... मोहम्मद रिजवान (mohammad rizwan) याच्यापासून भारतीय खेळाडूंना सावध राहायला हवे. मोहम्मद रिजवान (mohammad rizwan) गेल्या काही दिवसांपासून तुफान फॉर्मात आहे. नुकतेच श्रीलंकेविरोधात रिजवान याने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे भारतीय संघाला बाबार आझमपेक्षा मोहम्मद रिझवान याच्यापासून सावध राहायला हवं.
मोहम्मद रिजवान शानदार फॉर्मात -
मोहम्मद रिजवान याच्या वादळी खेळीमुळे विश्वचषकात पाकिस्तान संघाने विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला. यामध्ये मोहम्मद रिजवान याने नाबाद 131 धावांची खेळी केली होती. पाकिस्तान संघाने विश्वचषकातील सर्वात मोठा रन चेस केला. या सामन्याआधी मोहम्मद रिजवान याने नेदरलँड विरोधात 68 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय सराव सामन्यात मोहम्मद रिजवान याने न्यूझीलंडविरोधत 103 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच आशिया चषकात मोहम्मद रिजवान याने श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात अनुक्रमे 86 आणि 63 धावांची खेळी केली होती. इतकेच नाही तर आशिया चषकाआधी अफगाणिस्तानविरोधात जालेल्या मालिकेतही मोहम्मद रिजवान याने खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. आशिया चषकात मोहम्मद रिजवान याला मोठी धावा करता आली नव्हती, तो फक्त दोन धावांवर बाद झाला होता. पण गेल्या सहा महिन्यांपासून मोहम्मद रिजवान भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे टीम इंडियाला बाबरपेक्षा मोहम्मद रिजवान याच्यापासून जास्त धोका असल्याचे दिसतेय.
आज, नरेंद्र मोदी स्टेडिअमवर मोहम्मद रिजवान भारतीय गोलंदाजीचा सामना कसा करतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मोहम्मद रिजवान याने आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी मोक्याच्या क्षणी धावा काढल्या आहेत. मोहम्मद रिजवान फिरकी गोलंदाजीही चांगली खेळतो, तो धावसंख्या हालती ठेवतो. त्यामुळेच भारतासाठी मोहम्मद रिजवान डोकेदुखी ठरु शकतो. पण भारतीय गोलंदाजीचा सामना करणे मोहम्मद रिजवानसाठी सोपं नसेल. बाबर आझम सध्या फॉर्मात नाही, त्यातच त्याचा भारताविरोधातील रेकॉर्ड्सही तितका चांगला नाही. बाबर आझम याने भारताविरोधात आतापर्यंत एकही मोठी खेळी केलेली नाही. अबदुल्ला शफीक याने गेल्या सामन्यात शतकी खेळी केली, पण भारताविरोधातील दबाव मोठा असेल, अशात तो कशी कामगिरी करतो, याकडेही लक्ष असेल. भारतीय संघापुढील सर्वात मोठा धोका हा मोहम्मद रिजवान हाच असेल.