IND vs PAK Match Prediction : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये आज अटीतटीचा सामना होणार आहे. नरेंद्र मोदी स्टोडिअमवर (Narendra Modi Stadium) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा आमना सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा (IND WON) विजय निश्चित मानला जातोय. प्रत्येक फॅक्टर भारताच्या विजयाच्या बाजूने इशारा करत आहे. त्यामुळे आजच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताचा विजय निश्चित मानला जातोय. त्याची सात कारणे आहेत. पाहूयात त्याबाबत
कारण नंबर-1 :
विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा आतापर्यंत सातवेळा पराभव केला आहे. पाकिस्तानला एकदाही भारताचा पराभव करता आला नाही. 1992 ते 2019 यादरम्यान सातवेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आज विश्वचषकातील आठवा सामना या दोन्ही संघामध्ये होत आहे. विजय रथ कायम ठेवण्यासाठीच भारत मैदानात उतरणार आहे.
कारण नंबर-2:
विश्वचषकात भारताने आतापर्यंत 86 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत. भारताच्या विजायाची टक्केवारी 65 इतकी आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाने विश्वचषकात 81 सामने खेळलेत, यामध्ये 47 जिंकले आहेत. पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारी 59 इतकी आहे. भारतीय संघाची विश्वचषकातील कामगिरी सरस आहे.
कारण नंबर-3:
विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना असला की खेळाडूंवर अतिरिक्त दबाव असतो. हाच दबाव गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दिसून येतो. इतकेच नाही तर फिल्डिंग करतानाही दिसतो. विश्वचषकात पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताच्या फलंदाजांचे झेल सोडले आहेत. पाकिस्तानचे फलंदाजही दबावात आहेत.
कारण नंबर-4:
भारतीय संघ होम ग्राऊंडवर खेळत आहे. अमहदाबादच्या खेळपट्टीला भारतीय खेळाडू चांगल्या पद्धतीने ओळखतात. घरच्या परिस्थितीचा फायदा टीम इंडियाला नक्कीच मिळाले. त्याशिवाय एक लाख चाहत्यांचा सपोर्ट टीम इंडियाच्या बाजूने असेल.
कारण नंबर-5:
ICC वनडे क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
कारण नंबर-6:
भारताची फलंदाजी पाकिस्तानच्या तुलनेत खूप मजबूत आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या हे सर्व तुफान फॉर्मात आहे. रोहित, विराट आणि राहुल यांनी मागील दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पाडला आहे. पाकिस्तानची फलंदाजी सध्या फक्त मोहम्मद रिजवान याच्यावर अवलंबून आहे. कर्णधार बाबर आझम याला अद्याप मोठी खेळी करता आली नाही.
कारण नंबर-7:
जसप्रीत बुमराहचे संघात कमबॅक, ही भारतीय संघाची जमेची बाजू आहे. बुमराहमुळे भारतीय गोलंदाजी अधिक भेदक आणि आक्रमक झाली आहे. फिरकीमध्ये कुलदीप, जड्डू आणि अश्विन यांच्याकडे तगडा अनुभव आहे. भारताच्या गोलंदाजीत संतुलन दिसत आहे. पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाज दर्जेदार आहेत, पण फिरकी गोलंदाजी कमकुवत आहेत.