India vs Pakistan Women's T20 World Cup : महिला टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफ हिने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. स्मृती मंधानाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्याला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सलामी सामना आहे. भारताची धुरा हरनप्रीत कौरच्या हातात तर पाकिस्तानची धुरा बिस्मा मारूफकडे आहे.
भारतीय महिलांचा संघ कसा आहे?
शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकिपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, राधा यादव,राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह
पाकिस्तानची प्लेईंग 11 -
जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकीपर), बिस्माह मारूफ (कप्तान), निदा डार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयशा नसीम, फातिमा सना, ऐमन अनवर, नशरा संधू, सादिया इकबाल
भारत-पाक कुणाचं पारडे जड?
महिला भारतीय टीम आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 13 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 10 सामन्यात विजय नोंदवला आहे. तर पाकिस्तानच्या संघाला तीन विजय मिळवता आलेत. आज होणाऱ्या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जातेय.
स्मृती मंधाना दुखापतग्रस्त -
पाकिस्तानविरोधातील हायहोल्टेज सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक स्मृती मंधाना ही दुखापतग्रस्त झाली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्याला तिला मुकावं लागले आहे. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झाली होती.
T20 विश्वचषकात भारताचे सामने कधी-कधी होणार आहेत?
12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)