Virat Kohli and Rohit Sharma : भारतीय संघाचे (Team India) दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) मागील दोन टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नसल्याचं दिसून आलं आहे. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दोघे नव्हते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतही टीम इंडियामध्ये विराट-रोहित बाहेर आहेत. अशा परिस्थितीत विराट आणि रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द इथेच संपली आहे का? तसंच टी-20 विश्वचषक 2024 मध्ये ते संघात असतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान माजी क्रिकटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहू असे काहीसे उत्तर दिले.


काय म्हणाले गावस्कर?


इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, 'मी ज्या पद्धतीने या निर्णयाकडे पाहत आहे, त्यावरून असं दिसतं की पुढील वर्षी टी-20 विश्वचषक होणार आहे आणि नवीन निवड समितीला यावेळी अधिकाधिक तरुणांना संधी द्यायची आहे. मात्र, याचा अर्थ रोहित किंवा कोहलीच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असा अजिबात नाही. या दोघांनी 2023 मध्येही चांगली कामगिरी सुरू ठेवल्यास 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्यांचा समावेश नक्कीच केला जाऊ शकतो. विराट आणि रोहितला न्यूझीलंडविरुद्धच्या T20 संघातून बाहेर ठेवण्याबाबत गावस्कर म्हणाले की, "ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळवली जाणार असल्याने निवडकर्त्यांनी त्यांना विश्रांती दिली असावी जेणेकरून ते या महत्त्वपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करु शकतील."


टीम इंडियाचं वेळापत्रक फारच व्यस्त


सध्या भारतीय संघ बॅक टू बॅक क्रिकेट खेळत आहे. एक मालिका संपल्यानंतर लगेचच दुसरी मालिका सुरू होते. अशा परिस्थितीत सतत क्रिकेट खेळल्याने खेळाडूवर कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे निवड समिती खेळाडूंनाही विश्रांती देत ​​आहे. टीम इंडियाकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळेच विराट आणि रोहितसारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतरही टीम इंडिया विरोधी संघापेक्षा मजबूत दिसत आहे.


हे देखील वाचा-