Pakistan vs England : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना (T20 World Cup 2022 Final) ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान इंग्लंडचे खेळाडू गोलंदाजीसाठी मैदानात आले असताना त्यांनी काळी पट्टी हाताला बांधल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ही काळी पट्टी त्यांनी इंग्लंडचे माजी क्रिकेटर डेविड इंग्लिश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बांधली आहे. काल म्हणजेच 12 नोव्हेबर रोजी डेविड यांचं निधन झालं असून त्यांना इंग्लंड क्रिकेटचे गॉडफादर म्हणून संबोधलं जातं.


डेविड हे एक क्रिकेटर असण्यासोबत अभिनेता, लेखकही होते. त्यांचा जन्म 1946 मध्ये लंडनमध्ये झाला. शाळा सोडल्यानंतर ते क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर ग्राउंड स्टाफ म्हणून काम करत होते. नंतर ते मेरीलेबोन क्रिकेट क्लबसाठी क्रिकेटही खेळले. डेली मेलवर पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलं. अभिनय आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केल्याने एक अष्टपैवू व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांच्या निधनाची बातमी कळाल्यावर अनेक इंग्लंडच्या क्रिकेटर्सनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.






फायनलसाठी कसा आहे इंग्लंडचा संघ?


इंग्लंड संघाच्या अंतिम 11 चा विचार करता त्यांचा संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यांची सलामीची जोडी बटलर आणि हेल्सही अप्रतिम खेळी करत आहे, म्हणूनच त्यांनी भारताला 10 विकेट्सनी सेमीफायनलमध्ये मात दिली. ज्यामुळे इंग्लंड संघाने आज एकही बदल केलेला नाही. सेमीफायनलमध्ये खेळवलेलाच संघ त्यांनी मैदानात उतरवला असून नेमका संघ कसा आहे पाहूया...


इंग्लंडचा संघ


जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, ख्रिस जॉर्डन. 


हे देखील वाचा-