Pakistan vs England, Toss Update : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) या यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याला (T20 World Cup 2022 Final) सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. या महामुकाबल्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला आधी कमी धावांत रोखून नंतर निर्धारीत लक्ष्य सहज पार केलं तसाच डाव आजही त्यांनी आखला आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानची गोलंदाजी अत्यंत तगडी असल्याने सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे.






विशेष म्हणजे दोन्ही संघानी एकही बदल न करता सेमीफायनलमध्ये खेळवलेलाच संघ आजही मैदानात उतरवला आहे. कारण दोन्ही संघानी मागील काही सामने तसंच सेमीफायनलमध्येही कमालीचा खेळ दाखवला. पाकिस्तान संघाची गोलंदाजी तर सध्या जगात अव्वल दर्जाची असल्याने त्यांनी त्याचा पुरेपुर फायदा घेतला आहे. तर सलामीची जोडी बाबर आणि रिझवान यांनीही सेमीफायनलमध्ये कमाल दाखवल्याने त्यांचा फॉर्म परतल्याचं दिसून येत आहे. इंग्लंड संघाची सलामीची जोडीही अप्रतिम आहे, म्हणूनच त्यांनी भारताला 10 विकेट्सनी सेमीफायनलमध्ये मात दिली. ज्यामुळे दोन्ही संघानी आज एकही बदल केलेला नाही तर नेमका संघ कसा आहे पाहूया...


कस आहे पाकिस्तानचा संघ?


बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शादाब खान, शान मसूद, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.


कसा आहे इंग्लंडचा संघ?


जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, ख्रिस जॉर्डन. 


हेड टू हेड रेकॉर्ड


पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत तब्बल 28 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यात इंग्लंडचं पारडं कमालीचं जड दिसून आलं आहे. कारण त्यांनी एकूण 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 9 सामन्यात पाकिस्तानचा संघ जिंकला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णीत सुटला आहे. 


हे देखील वाचा-