Team India in T20 World Cup 2022 : टीम इंडियाचा (Team India) अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने एक दमदार रेकॉर्ड नुकताच आपल्या नावे केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात एक मेडन ओव्हर टाकत भुवनेश्वरनं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 मेडन ओव्हर्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणाऱ्यांमध्ये तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताच्याच जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) भुवनेश्वरनं मागे टाकलं आहे.


भारतीय संघातील एक सर्वात अनुभवी गोलंदाज म्हटलं तर भुवनेश्वर कुमार. मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी20 विश्वचषक खेळत नसल्याने एक अनुभवी गोलंदाज म्हणून शमी आणि भुवनेश्वर संघात आहेत. शमी मागील काही काळ संघापासून दूर असला तर भुवी मात्र सातत्याने सामने खेळत आहे. काही काळापासून तो खराब कामगिरीमुळे चर्चेत होता. सामन्यात सुरुवातीला तो उत्तम गोलंदाजी करतो, पण अखेरच्या षटकात तो महागडा ठरल्याचं दिसून आलं आहे. पण तरी तो आपल्या गोलंदाजीवर काम करत असून टीम इंडियाला शक्य तितक योगदान देत आहे. आज झिम्बाब्वेविरुद्धही त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत, उत्तम गोलंदाजी केली. त्याने टाकलेल्या मेडन ओव्हरमुळे त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 मेडन ओव्हर्स पूर्ण झाल्या आहेत. 


टॉप 5 कोण?


भुवनेश्वर कुमार 10 मेडन ओव्हर्ससह पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या क्रमांकावर भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह 9 मेडन ओव्हर्ससह आहे. तिसऱ्या स्थानावर जर्मनी संघाचा गुलाम अहमदी 8 मेडन ओव्हर्ससह आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानवार अनुक्रमे युगांडाचा एन. न्सुबुगा (8 मेडन ओव्हर्स) ओमानचा बिलाल खान (6 मेडन ओव्हर्स) विराजमान आहेत. 


भारताचं झिम्बाब्वेसमोर 187 धावाचं लक्ष्य


नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि राहुल मैदानात आले, पण कर्णधार रोहित 15 धावा करुनच तंबूत परतला. कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. पण राहुलने आज संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सामन्यात अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली. ज्यामुळे झिम्बाब्वेसमोर 187 धावाचं आव्हान आहे.


हे देखील पाहा-


Arshdeep Singh Life Story : वडील कॅनडाला पाठवत होते, पण गड्यानं एक वर्ष मागितलं आणि इतिहास घडवला