T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात आज टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केलाय. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ऐवजी युवा फलंदाज ऋषभ पंतला (Rohit Sharma) संघात स्थान देण्यात आलंय. टी-20 विश्वचषकाचा भारतीय संघाच भाग असलेल्या ऋषभ पंतला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यामुळं झिम्बाब्वेविरुद्ध मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा ऋषभ पंतचा प्रयत्न असेल.
ट्वीट-
कधी, कुठं पाहणार सामना?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 6 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात.
सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना
नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर भारताचं सेमीफायनलमधील स्थान पक्क झालंय. त्यानंतर पाकिस्ताननं बांगलादेशच्या संघाला पराभवाचा धुळ चारत सेमीफायनचं तिकीट मिळवलं. सध्या भारत आणि झिम्बाब्ले यांच्यात टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर सेमीफायनला सुरुवात होणार आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
झिम्बाब्वेची प्लेईंग इलेव्हन:
वेस्ली मधेवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकीपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबान.
हे देखील वाचा-