T20 World Cup 2022: भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यात आज टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा तडाखेबाज सूर्याकुमार यादवनं (SuryaKumar Yadav) खास विक्रमाला गवसणी घातलीय. कॅलेंडर वर्षात म्हणजेच चालू वर्षात 1000 धावांचा टप्पा गाठणारा सूर्याकुमार यादव पहिला खेळाडू ठरला आहे. 

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सध्या सूर्यकुमार यादव टॉपवर आहे. या यादीत पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान 924 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर विराट कोहली (731 धावा) तिसऱ्या, श्रीलंकेचा फलंदाज पाथुन निसांका (713) चौथ्या आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (701 धावा) पाचव्या क्रमांकावर आहे. 

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा (2022) - 

क्रमांक नाव धावा
1 सूर्यकुमार यादव 1026
2 मोहम्मद रिझवान 924
3 विराट कोहली 931
4 पाथुन निसांका 913
5 सिकंदर रझा 701

भारताचं झिम्बाब्वेसमोर 187 धावांचं आव्हान
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात पुन्हा एकदा सूर्याची बॅट तळपल्याची पाहायला मिळाली. झिम्बाब्बेविरुद्ध सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली. या सामन्यात सूर्यानं अवघ्या 25 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली. सूर्याच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. 

हे देखील वाचा-