T20 World Cup Team India : कोच राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वात भारतीय संघ (Team India) सध्या वेगवेगळ्या स्पर्धा खेळत आहे. पण भारतीय संघाचं सर्व लक्ष टी 20 वर्ल्डकपच्या तयारीवर आहे. 2022 च्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्डकपचा रनसंग्राम रंगणार आहे. त्यासाठी प्रत्येक संघ तयारी करत आहे. संघातील खेळाडूंची चाचपणीही केली जात आहे. सध्या भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात टी 20 मालिका खेळत आहे. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यापासून भारतीय संघ टी 20 वर्ल्डकपची तयारी सुरु करणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टी 20 वर्ल्डकपसाठीचा मास्टरप्लॅन सांगितलाय. 


एका मुलाखतीत सौरव गांगुलीला टी 20 मधील भारताच्या कामगिरीवर आणि पुढील वाटचालीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना गांगुली म्हणाला की, कोच राहुल द्रविड भारताच्या रणनितीवर काम करत आहे. इंग्लंड दौऱ्यापासून भारताच्या मिशन वर्ल्डकपची खरी तयारी सुरु होईल.  सौरव गांगुली म्हणाला की, टी 20 वर्ल्डकपसाठी राहुल द्रविड प्लॅन तयार करत आहे. टी 20 वर्ल्डकपच्या संघात असलेल्या संभावित खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यात खेळाताना पाहायला मिळेल. कोणता खेळाडू कुठे फिट बसेल, याबाबतचे सर्व प्रयोग इंग्लंड दौऱ्यात केले जाऊ शकतात.


दरम्यान, दक्षिण आफ्रिकाविरोधात ऋषभ पंत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.  रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यासारखे अनुभवी खेळाडू संघाचा भाग नाहीत. राहुल दुखापतीमुळे बाहेर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हापासून भारताचं मिशन टी 20 वर्ल्डकप सुरु होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, तर कोच राहुल द्रविड आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही जोडी इतिहास रचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.  


हे देखील वाचा-