Hardik Pandya on MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. 2-0 ने पिछाडीवर असणाऱ्या भारताने आता मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. शुक्रवारच्या करो या मरोच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. यावेळी संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने तडाखेबाज 46 धावांची खेळी केली. जी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. दरम्यान हार्दिक सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत असून आधी आयपीएलचा खिताब गुजरातला जिंकवून दिल्यानंतर आताही तो कमाल फॉर्ममध्ये आहे. दरम्यान हार्दिकने या खेळीमागे माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचा एक मोलाचा सल्ला असल्याचा खुलासा केला आहे. 'स्वत:च्या नाही, तर संघाच्या धावसंख्येचा विचार कर' हा सल्ला धोनीने हार्दिकला दिल्याचं हार्दिकने सांगितलं.


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना भारताने तब्बल 82 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. या सामन्यानंतर मॅचमध्ये महत्त्वाची खेळी करणाऱ्या कार्तिक आणि पांड्या जोडीने बातचीत करताना हार्दिकने धोनीने दिलेल्या एका महत्त्वाच्या सल्ल्याबाबत खुलासा केला. हार्दिकने धोनीला एक प्रश्न विचारला होता की, सामन्यादरम्यान येणाऱ्या तणावातून कसं मुक्त व्हायचं, याचं उत्तर देताना धोनी म्हणाला होता, 'फार सोपं आहे खेळताना स्वत:च्या नाही तर संघाच्या धावसंख्येचा विचार करायचा.' धोनीच्या याच सल्ल्याचा फायदा हार्दिकला आजही होत असल्याचं त्याने यावेळी सांगितलं. 



हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी


यंदा हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून उत्तम खेळत खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघाला आयपीएल 2022 चं जेतेपद हार्दिकने मिळवून दिलं. शिवाय गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 15 सामन्यात 487 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 44.27 असून स्ट्राइक रेट 131.26 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करताना दिसून आला.  


हे देखील वाचा-