Rishabh Pant Trolling : आयपीएल 2022 नंतर आता  भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. यावेळी संघाचं नेतृत्त्व केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यावर ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) देण्यात आलं. पण दिलेल्या जबाबदारीप्रमाणे त्याने खास कामगिरी केलेलीच नाही. चारही सामन्यात मिळून त्याने केवळ 57 धावाच केल्या आहेत. त्यामुळे आता तो ट्वीटरवर कमाल ट्रोल होत असून युजर्स संजू सॅमसन (Sanju Samson) आणि दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संधी द्यायला हवी होती अशा प्रकारचे मीम्सही शेअर करत आहेत.
 
सध्या सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात ऋषभ पंतने 4 टी20 मॅचमध्ये 14.25 च्या सरासरीने 57 धावा केल्या आहेत.त्याचा स्ट्राईक रेटही यावेळी केवळ 105.55 इतकाच होता. तो आयपीएल 2022 पासून आतापर्यंत साधं एक अर्धशतकही ठोकू शकलेला नाही. या सर्व खराब फॉर्ममुळे तो भयानक ट्रोल होत आहे. एका  यूजरने कमेंट करत 'आपण ऋषभ पंतच्या शोधात संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिकला गमावल' अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. याशिवायही आणखी बरेच मीम्स शेअर करण्यात आले असून यावर एक नजर फिरवूया... 







आता रविवारी महामुकाबला


भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात चौथा टी20 सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium) खेळवला गेला. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरम्यान महत्त्वाचा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेत दोन्ही संघाचा स्कोर 2-2 असून रविवारी (19 जून) होणाऱ्या फायनल सामन्यात मालिकेचा रिझल्ट समोर येईल.


हे देखील वाचा-