Aakash Chopra T20 World Cup Team : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) सर्व संघानी तयारी सुरु केली आहे. प्रत्येकजण आपल्या संघाची चाचपणी करत आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारतीय संघाची निवड केली आहे. आकाश चोप्राने आयपीएल 2022 च्या आधारावर भारतीय संघाची निवड केली आहे. आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) संघामध्ये विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऋषभ पंतसारख्या (Rishabh Pant) दिग्गज खेळाडूंना संधी मिळालेली नाही. आकाश चोप्राने आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर संघ तयार केल्याचे स्पष्ट सांगितलेय.
हार्दिक पांड्या कर्णधार -
आकाश चोप्राने (Aakash Chopra) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) आपल्या संघाची धुरा सोपवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 वर नाव कोरलेय. आकाश चोप्राने केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्याकडे सलामीची जबाबदारी सोपवली आहे. सनराइजर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderbad) शानदार प्रदर्शन करणाऱ्या राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे. आकाश चोप्राने क्रृणाल पांड्यालाही संघात स्तान दिलेय. क्रृणाल पांड्याला अष्टपैलू म्हणून स्थान दिलेय.
दिनेश कार्तिक फिनिशर -
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) क्रणधार संजू सॅसमन (Sanju Samson) लाही संघात स्थान दिलेय. तर आरसीबीसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) फिनिशर म्हणून संघात स्थान दिलेय. आकाश चोप्राने गोलंदाजीत अर्शदीप सिंह(Arshdeep Singh), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) यासारख्या खेळाडूंना संघात स्थान दिलेय. त्याशिवाय युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), मोहम्मद शमी, (Mohammed Shami), आवेश खान (Avesh Khan), दीपक हूडा (Deepak Hudda) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांनाही स्थान दिलेय.
हे देखील वाचा-