Shubman Gill Health Update : भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) च्या प्रकृतीमध्ये सुधारणा (Health Update) झाली असून त्याला रुग्णालयातून (Hospital) डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. प्लेटलेट्स (Platlets) कमी झाल्यामुळे त्याला चेन्नईमधील रुग्णालयात (Chennai Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज (Shubman Gill Discharged) देण्यात आला आहे.


शुभमन गिलची प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज


शुभमन गिलला गेल्या आठवड्यात डेंग्यू (Dengue) ची लागण झाल्याची माहिती होती. त्यनंतर त्याला सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळीत तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याने शुभमन गिलला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.






 






पाकिस्तान विरुद्ध सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम


भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यापूर्वी सोमवारी शुभमन गिलला चेन्नई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे गिल भारतीय संघासोबत अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला गेलेला नाही. आता त्याला डिस्चार्ज मिळाला असून 14 ऑक्टोबर रोजी होणार्‍या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.






टीम इंडिया दिल्लीला पोहोचली


टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्धच्या आगामी सामन्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. भारतआणि  अफगाणिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी नंतर टीम इंडिया विश्वचषच 2023 मधील विजयी वाटचाल कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


Virat Kohli : चेज मास्टर 'किंग' कोहली! विराटने सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे