ICC ODI World Cup 2023 : भारताचा (Team India) स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) च्या तब्येतीबाबत मोठी अपडेट (Health Update) समोर आली आहे. शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे. शुभमन गिलला गेल्या आठवड्यात डेंग्यूची (Dengue) लागण झाली असून त्याची तब्येत बिघडल्याने त्याला आता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. प्लेटलेट्स कमी झाल्याने शुभमन गिलला चेन्नईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


शुभमन गिल रुग्णालयात दाखल


बीसीसीआयने मंगळवारी शुभमन गिलचं हेल्थ अपडेट जारी केलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, शुभमन गिल टीम इंडियासोबत दिल्लीसाठी रवाना झालेला नसून तो चेन्नईमध्येच उपचार घेत आहे. सोमवारी संध्याकाळी शुभमन गिलचे प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 






शुभमन पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची शक्यता धूसर


शुभमन गिल आधीच अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. आता त्याच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वापसीची शक्यताही फार कमी आहे. शुभमन गिलही शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या शानदार सामन्यात मैदानात दिसण्याची चिन्ह आणखी धूसर झाली आहे. शुभमन गिलने यावर्षी भारतासाठी वनडेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे शुभमन गिलच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होत आहे.


टीम इंडियासाठी शुभमन गिल का महत्वाचा आहे?


शुभमन गिल सराव कधी सुरू करणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयचे डॉक्टर गिल यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. सरावाच्या अभावी गिल  पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याची दाट शक्यता असून पुढील आठवड्यातही तो मैदानात उतरेल की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.


विश्वचषकात भारताची फलंदाजी मोठ्या प्रमाणावर टॉप ऑर्डरवर अवलंबून असते. भारताची खालच्या क्रमवारीतील फलंदाजी फारशी चांगली नाही. जडेजाला एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अश्विन भरवशाचा फलंदाज नाही. याशिवाय बुमराह, सिराज आणि कुलदीप यांना फलंदाजीमध्ये कोणतंही योगदान देता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडियाला आपला स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिल लवकरात लवकर परतण्याची अपेक्षा आहे.