Virat Kohli's Record : भारताचा (Team India) स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) चेज मास्टर (Chase Master) असल्याचं दाखवून दिलं आहे. विराट कोहलीने आणखी एक विक्रम (Virat Kohli Record in ODI) रचला आहे. धावांचा पाठलाग करण्यात विराट कोहलीने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) लाही मागे टाकलं आहे. या नव्या विक्रमासह कोहलीने दाखवून दिलं आहे की, तोच बेस्ट चेज मास्टर आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहलीने लक्ष्याचा पाठलाग करताना 85 धावांची दमदार खेळी केली. या शानदार खेळीसह विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा यशस्वी फलंदाज बनला आहे.
चेज मास्टर कोहली
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना 5517 धावा पूर्ण केल्या आहेत. या आकडेवारीसह त्याने महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. चेपॉक, चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने अवघ्या 2 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसह धावांचा पाठलाग करून भारताला विजय मिळवून दिला. राहुल आणि कोहली यांच्यात चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी झाली.
'किंग' कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 85 धावांसह कोहली एकदिवसीय विश्वचषाकामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने 1115 धावा पूर्ण केल्या आहेत. आता पुढच्या सामन्यात केवळ 111 धावा करून कोहलीला 10 व्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. सध्या वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा 1225 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
कोहली-राहुलच्या भागीदारीचाही विक्रम
केएल राहुल आणि विराट कोहलीची चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी ही क्रिकेट विश्वचषकात भारतासाठी चौथ्या किंवा खालच्या विकेटसाठीची दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे विश्वचषकात भारताची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. सामन्यात कोहलीने 85 धावा केल्या आणि केएल राहुलने नाबाद 97 धावा केल्या. राहुलने षटकार मारून सामना संपवला.
महत्वाच्या इतर बातम्या :