मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा न्यूझीलंडचा (New Zeeland) कर्णधार केन विल्यमसनने डॅरिल मिशेलसह शानदार खेळी करत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. त्याला दमदार अशी साथ डॅरिल मिशेल याने दिली. डॅरिल मिशेल यांने 89 धावांची नाबाद खेळी केली. तर कर्णधार विल्यमसन (Williamson) हा 8 धावा करून निवृत्त झाला. न्यूझीलंडचा विश्वचषकातील (World Cup) हा सलग तिसरा विजय ठरला आहे. यादरम्यान बांगलादेशकडून मुस्तफिझूर आणि कर्णधार शकीबने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बांगलादेशला 50 षटकात 245 धावांवर रोखले. संघाकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनीही उत्कृष्ट गोलंदाजीचे केल्याचं पाहायला मिळालं.
या सामन्यात 246 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. सलामीला आलेला रचिन रवींद्रने 13 चेंडूत 9 धावा केल्या आणि त्याला माघारी फिरावे लागले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या केन विल्यमसनने डेव्हॉन कॉनवेसोबत 105 चेंडूंमध्ये 80 धावांची भागीदारी केली. 21 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोघांमधील ही भागीदारी तुटली. शकीब अल हसन याने डेव्हॉन कॉनवे याची विकेट घेतली. पण त्यानंतर न्यूझीलंडने एकही विकेट गमावली नाही.
तर कर्णधार केन विल्यमसन 39 व्या षटकात 107 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्यानंतर निवृत्त झाला. पण त्याआधी विल्यमसनने चौथ्या क्रमांकावर आलेल्या डॅरिल मिशेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. या सामन्यात विल्यमसन चांगलाच फॉर्ममध्ये दिसत होता.
विल्यमसनच्या निवृत्तीनंतर ग्लेन फिलिप्स फलंदाजीला आला. त्याने 11 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारून 16 धावा केल्या. तर याचवेळी मैदानात असलेल्या डॅरिल मिशेलने 67 चेंडूत 6 चौकार आणि 89 धावांची नाबाद खेळी केली. मिशेल सुरुवातीपासूनच काहीसा आक्रमक दिसत होता. त्याने 132.84 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. तर मिशेल आणि फिलिप्स चौथ्या विकेटसाठी 48 धावांची नाबाद भागीदारी केली.
बांगलादेशी गोलंदाज अपयशी ठरले
बांगलादेशचे फलंदाज देखील विशेष कामगिरी करु शकले नाही.बांगलादेशाचे गोलंदाज मात्र या सामन्यात काहीसे अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं. फक्त कर्णधार शकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. यादरम्यान शकिबने 10 षटकांत 54 धावा तर मुस्तफिझूरने 8 षटकांत 36 धावा दिल्या.