T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं. अॅडिलेड येथे खेळेल्या गेलेल्या या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेय बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केलीय. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली सामोरे जाणार आहेत.या बैठकीत बोर्डाचे सचिव जय शहा संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घेणार आहेत.


बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की, “आम्ही एक बैठक घेणार आहोत. सेमीफायनलच्या पराभवातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. संघात बदल हवा आहे. या पुनरावलोकनात संघाचं ऐकून घेणं महत्वाचं आहे.संघाचं म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. यासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून माहिती घेऊन भविष्यातील टी-20 संघ तयार केला जाईल.


संघ निवडीमुळं बीसीसीआय नाराज
या स्पर्धेनंतर बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचं दिसून आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समितीवर नाराज असल्याचे सांगण्यात आलंय. या बैठकीत निवड समितीच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. सध्या चेतन शर्मा हे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष असून त्यांना या पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, चेतन शर्मा या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. 


खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही कोणा एका खेळाडूचा विचार करत नाही, आम्ही संपूर्ण संघाचा विचार करत आहोत. खेळाडू स्वतः निर्णय घेऊ शकतात. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यासह इतर नॉक आऊट सामन्यातील खराब कामगिरी रोखण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.


पुन्हा भारताचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरआणि अॅलेक्स हेल्सनं वादळी खेळी भारतासाठी फायनलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. 


हे देखील वाचा-