T20 World Cup 2022: आयसीसीच्या टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर जगभरात लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमिअर लीग टीकाकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी बाबर आझम (Babar Azam) पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आला, त्यावेळी त्याला आयपीएलसंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. यानंतर बाबर थोडा अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पाकिस्तानी मीडिया मॅनेजरला मध्यस्ती करावी लागली. 


इंग्लंडविरुद्ध मोठ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं बाबरला विचारलं होतं की, "जर आपण आयपीएलमध्ये खेळण्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर तुम्हाला किंवा तुमच्या संघाला त्यात खेळण्याचा फायदा मिळू शकेल असं वाटतं का? भविष्यात तुम्हाला आयपीएल खेळण्याची काही आशा आहे का?" त्यावेळी पाकिस्तानी मीडिया मॅनेजरनं त्या पत्रकाराला मध्येच थांबवलं. तसेच येथे टी-20 विश्वचषकाच्या फायनलबाबत प्रश्न विचारले जात असल्याचं त्यांनी संबंधित पत्रकाराला म्हटलं.


व्हिडिओ- 






 


यंदाही पाकिस्तानचा संघ रोजे ठेवून फायनल खेळणार
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ प्रत्येक गोष्टी करून पाहतोय, ज्यामुळं त्यांना विश्वचषकावर नाव कोरता येईल. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे खेळाडू आणि सदस्यांनी रोजे ठेवले आहेत. रोजे ठेवल्यानं त्यांना 1992 सारखा विजय प्राप्त होईल, असं त्यांचा विश्वास आहे. पाकिस्तानच्या संघानं 1992 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं होतं.


पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान, मोहम्मद हॅरीस


इंग्लंडचा संघ-
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स, टायमल मिल्स. 


हे देखील वाचा-